मुंबई: सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सव (Ganesh Festival 2021), नवरात्रौत्सव (Durga Utsav), दसरा (Dasara) आणि दिवाळीत तुम्ही फोर्ड कंपनीची (Ford) गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेची दिग्गज कार निर्माता कंपनी ‘फोर्ड’नं एक मोठा निर्णय घेतल्याचं समजतं. फोर्ड कंपनीनं भारतातून आपलं बस्तान गुंडाळलं आहे. त्यामुळे आता फोर्ड कंपनीची कार खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. भारतीय ग्राहकांना विदेशातून कार मागवावी लागेल. त्यामुळे जादा किंमत मोजावी लागेल.Also Read - Realme Narzo 30 5G चं स्वस्त व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, फोर्ड मोटर कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कंपनीकडून अधिककृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. Also Read - SSC GD Constable Recruitment: GD कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, 10वी पास असणाऱ्यांनी लवकर करा अर्ज!

फोर्डनं भारतातील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीची गाडी घ्यायची असेल किंवा त्याचे पार्ट्स मागवायचे असतील तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण गाडी थेट विदेशातून आयात करावी लागणार आहे. Also Read - Independence Day: देशवासियांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी असा साजरा केला स्वातंत्र्य दिन, एकदा फोटो बघा!

आर्थिक संकटात सापडलेल्या फोर्ड कंपनीला ‘इको स्पोर्ट्स’ (Ecosports) लाँच झाल्यावर भारतीय बाजारपेठेत चालना मिळाली. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंपनीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाहनांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. कोरोना काळात कंपनीला सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. याच कारणामुळे फोर्ड मोटरनं आता चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनी या प्लांट्सपासून बनवलेल्या इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर सारख्या वाहनांची विक्री देखील बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, भारतातील प्रसिद्ध कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्रासोबत असलेली भागीदारी संपल्यानंतर फोर्ड कंपनीनं आपलं बस्तान गुंडळण्याचा निर्णय घेतला. फोर्डच्या आधी, जनरल मोटर्स आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनीही भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला आहे.