FSSAI Recruitment 2022: FSSAI मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या कसा करावा अर्ज, काय आहे पात्रता?
FSSAI Recruitment 2022 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत ते अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

FSSAI Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत (Sarkari Naukri 2022) ते अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च आहे.अर्ज करण्यापूर्वी भरतीसंदर्भातील अधिसूचना नीट वाचावी असा सल्ला देण्यात आल आहे.
Also Read:
या भरतीअंतर्गत (FSSAI Recruitment 2022) फूड एनालिस्ट पदांवर 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. मात्र काम पाहून आणि आवश्यकतेनुसार करार एक वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2 पदे भरण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारंना नोकरी आणि चांगला पगार मिळेल.
FSSAI Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता
या भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्म विज्ञान, दुग्धशाळा, तेल या विषयातील तंत्रज्ञानाची पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्याही विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी असणे आवश्यक. तसेच उमेदवारांना अन्न विश्लेषणामध्ये किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे.
FSSAI Recruitment 2022 : जाणून घ्या अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in ला भेट द्या.
- होम पेजवरील Jobs@FSSAI लिंकवर क्लिक करून अर्जाची लिंक उघडा.
- विचारलेले आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.
- तुम्हाला हवा असल्यास कन्फर्मेशन पेज डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट आपल्याजवळ ठेवू शकता.
FSSAI Recruitment 2022 : निवड प्रक्रिया आणि वेतन
पात्र अर्जदारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखत फेरीच्या आधारे केली जाईल. फूड अॅनालिस्टची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवाराला दरमहा 60 हजार रुपये पगार दिला जाईल. तसेच कराराच्या अटींनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्याला 60,000 रुपये प्रतिमाह दिले जाईल.
(FSSAI Recruitment 2022, FSSAI, Sarkari Naukri 2022, fssai.gov.in, FSSAI Jobs 2022, Job in FSSAI, FSSAI jobs, Sarkari Naukri 2022, Government jobs, Educational Qualifications)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या