नवी दिल्ली : संपूर्ण देश गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) स्वागतामध्ये व्यग्र आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले जात आहे. गणेशभक्त वर्षभरापासून ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2021). या सणाला आजपासून सुरुवात झाली असून पुढचे दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीत ट्वीट (Tweet in Marathi) करत या शुभेच्छा दिल्या आहेत.Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

Also Read - Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, गणेशभक्तांना काळजी घेण्याचे आवाहन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट (PM Modi Tweet) करत गणेश चतुर्थीच्या (ganpati utsav) सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!’ Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

यावर्षी देखील गणेशोत्सवावर कोरोनाचे (Corona virus) सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव (ganesh chaturthi) अगदी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्याचसोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने गणेशोत्सवानिमित्त कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे पालन करत गणेशभक्त गणरायाचे स्वागत करत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार, पुणे, नाशिक, नागपूर या शहरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात केले जात आहे.