मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपणा सर्वांना परिचयाचेच आहे. आजच्या काळात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. एवढा की व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. आता चॅटिंगसोबत डॉक्यूमेंड सेअरींग आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देखील व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर केला जाऊ लागला आहे. केवळ तरुणच नाही तर लहान मुलं आणि वृद्ध देखील व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे लक्षात घेऊन कंपनी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. मात्र, सध्या जीबी व्हॉट्सअॅपची ( GB WhatsApp) सर्वत्र चर्चा आहे.Also Read - Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खुशखबर! ग्रुप कॉलसाठी आले आहे 'हे' तीन जबरदस्त फीचर्स

यूजर्सना GB WhatsApp हे नेमके काय आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. अशी चर्चा आहे की हे व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp) नवीन अपडेट आहे. आपण ते डाउनलोड करण्याचा विचार करत असाल तर एकदा त्याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चुकीचे अॅप डाउनलोड केल्याने तुम्ही अडचणीत सापडू शकता किंवा तुमची प्रायव्हसी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. Also Read - Whatsapp Upcoming Features : आता सेंड केल्यानंतर ही एडिट करता येईल मेसेज, लवकरच येत आहे व्हाट्सॲपच हे जबरदस्त फीचर

जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय?

जीबी व्हॉट्सअ‍ॅपबद्दल (GB WhatsApp) बोलताना सर्वप्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन नसून ते त्याचे क्लोन अ‍ॅप आहे. म्हणजेच GB WhatsApp मध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) प्रमाणेच मेसेजिंग, चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग इत्यादी सुविधा मिळेल. हे थर्ड पार्टीप्रमाणेच कस्टमाइज करण्याची सुविधा देते. याशिवाय या अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) तुलनेत काही अतिरिक्त फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळं त्याचा वापर करणे सोपे होते. परंतु त्याचा वापर यूजर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. Also Read - आता एकाच WhatsApp अकाउंटने अनेक डिव्हाइसवरून करता येणार चॅट, जाणून घ्या काय आहे प्लॅन

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमुळे होऊ शकते नुकसान!

आपणही जीबी व्हॉट्सअ‍ॅप (GB WhatsApp) डाऊनलोड करण्याचा विचार करत असाल तर आधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, ते डाउनलोड करणे आणि इन्स्टॉल करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. सर्वात मोठी बाब म्हणजे जीबी व्हॉट्सअॅपचा (GB WhatsApp) वापर सुरू केल्यास तुमचे मूळ व्हॉट्सअॅप अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते. एवढंच नाही तर जीबी व्हॉट्सअ‍ॅपवरून (GB WhatsApp) तुमची वैयक्तिक माहिती हॅक होण्याचा धोका आहे. कारण हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एपीके फाइल डाऊनलोड करावी लागेल, जी मुळीच सुरक्षित नाही. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. त्यामुळे हे अ‍ॅप सुरक्षिततेच्या बाबतीत योग्य नाही. तुम्हाला अशा प्रकारचं नुकसान नको असल्यास जीबी व्हॉट्सअॅपपासून (GB WhatsApp) दूर राहणे कधीही योग राहील.