मुंबई: तुम्ही सोनं खरेदी (Gold Price Today) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोनं (Gold Price) पुन्हा स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात मंगळवारी तब्बल 8800 रुपयांची घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात थोडासा बदल दिसून येत आहे. गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोने दरात प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे.Also Read - Gold Rate Today : सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती!

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा (Coronavirus) सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सराफ बाजारात मंदीचं वातावरण आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोनं 10 ग्रॅम 475 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मुंबई आणि पुण्यात मंगळवारी 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. Also Read - Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठी घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

चांदी महागली!

चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एक किलो चांदीसाठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या सहा दिवसांचा विचार करता सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर पुढचे तीन दिवस सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. Also Read - Gold-Silver Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या नवीन दर

आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम-

आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीत देखील घसरण झाली आहे रुपयांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यानं याचा देखील परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्यानं घट पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, पुढील काळात सोने किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोने किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर-

सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोनेच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.