मुंबई: सणासुदीच्या दिवसांत गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी आहे. सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारीही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. एका वर्षात सोनं (Gold Price Today) तब्बल 10200 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, MCX वर 10 ग्रॅम सोन्याचे दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होतं. मंगळवारी ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 46,001 रुपये आहे. तर चांदीच्या (Silver Price Today) दरात 0.22 टक्के घसरण झाली आहे. सोने खरेदी करण्याची योग्य वेळ असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.Also Read - Gold-Silver Rate Today: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोनं मंगळवारी 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 46,001 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबरव्यापारात चांदी 0.22 टक्के घसरली. 1 किलो चांदीची किंमत 60,503 रुपये आहे. Also Read - Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

सोने खरेदीसाठी उत्तम संधी

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. Also Read - Gold Rate Today: सोनं स्वस्त, चांदी जैसे थे! एका क्लिकवर जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

सोन्याची शुद्धता अशी ओळखा…

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे (indian standard organization) हॉल मार्क दिलं जातं. जितकं जास्त कॅरेट तितकं ते शुद्ध समजलं जातं. सोनं 24 कॅरेटपेक्षा जास्त नसतं. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असा उल्लेख असतो. देशात बहुतांश शहरात 22 कॅरेट सोनं सर्वाधिक विकलं जातं तर काही लोक 18 कॅरेट सोनं खरेदी करणं पसंत करतात.

50 हजारांवर पोहोचू शकतो दर…

सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते. सोनं स्वस्त झाल्यामुळे आता खरेदी करण्याची सूवर्ण संधी आहे. कारण वर्षाच्या अखेरीस सोनं 50 हजारांवर पोहोचू शकतं, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.