नवी दिल्ली : नुकताच शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये मोठी भरती होणार आहे. यावर्षी इन्फोसिस कंपनीमध्ये (Infosys Company) जवळपास 45 हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. इन्फोसिस कंपनीच्या या निर्णयामुळे चांगल्या नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.Also Read - Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात विनापरीक्षा अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, तगडा पगार; जाणून घ्या पात्रता

इन्फोसिस कंपनीचे सीओओ प्रवीण राव (Infosys COO Pravin Rao) यांनी सांगितले की, बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॅमला (College Graduate Hiring Program) या वर्षी वाढवून 45 हजारापर्यंत घेऊन जाणार आहोत. तसंच, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे सुरु करणार आहोत. यामध्ये हेल्थ आणि वेलनेसचे उपाय (Health and wellness measures), रिस्किलिंग प्रोग्रॅम ( reskilling programs) आणि करिअर वाढीच्या संधीचा (career growth opportunities) समावेश असणार आहे.’ Also Read - SSC Selection Posts Recruitment 2021: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी; 3261 पदांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पात्रता

इन्फोसिस कंपनीचा एट्रिशन रेट (Attrition rate of Infosys company) म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दरात वाढ झाली आहे. आयटी कंपनीमध्ये (IT Company) चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा सुरु आहे. अशावेळी इन्फोसिस कंपनीकडून या मोठ्या भरतीची ही घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने बुधारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या (financial year) सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 5,421 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये 4,845 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. Also Read - ITBP CAPF Recruitment 2021: ITBP, BSF मध्ये परीक्षेशिवाय अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; लवकरच करा अर्ज, 2.18 लाख पगार