नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येत्या दोन ते चार आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona) खूप जास्त फटका बसला. तिसऱ्या लाटेमध्ये जास्त नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारने (Central Government) लसीकरण मोहीमेवर (Vaccination) भर दिला आहे. सध्या देशात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. अशामध्ये 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळणार आहे. या मुलांसाठी लवकरच ‘झायडस कॅडिला’च्या लसीला (zydus cadila vaccine) मंजुरी देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) सांगितले.Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

केंद्र सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, ‘झायडस कॅडिलाच्या लसीचे 12 ते 18 वयोगटातील मुलांवरील वैद्यकीय चाचणी (Medical test) पूर्ण झाली आहे. भविष्यात ही लस या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेकची (India Biotech) कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) कोव्हॅक्सिनची 12 ते 18 वयोगटातील मुलांवर वैद्यकीय चाचणी सुरु करण्यात आली आहे.’ तिसऱ्या लाटेमुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आलेल्या पालकांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. Also Read - Maharashtra Political Crisis Live Update: "याचा अर्थ काय?" मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

सरकारने या प्रतिज्ञापत्रात असं सुद्धा म्हटलं आहे की, ‘देशातील 54 टक्के जनता खासगी रुग्णालयात उपचार घेते. तर 45 टक्के जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. देशामध्ये इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी 186.6 कोटी म्हणजे 93 ते 94 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. 25 जूनपर्यंत देशात 31 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.’ Also Read - Ajit Pawar Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत म्हणाले...

दरम्यान, ‘जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत देशात 51 कोटी डोस उपलब्ध होतील. तर ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत 135 कोटींचे डोस उलब्ध होतील. यामध्ये कोविशिल्डचे (covishield) 50 कोटी, कोव्हॅक्सिनचे (covaxin) 40 कोटी, बायोलटजिकल ईचे 30, झायडस कॅडिलाचे (zydus cadila) 5 कोटी आणि स्पुटनिक व्हीचे (sputnik v) 10 कोटी डोस यांचा समावेश असेल.’ असं केंद्र सरकारने सांगितले.