मुंबई: रिलायन्स जियोने (Reliance Jio) गूगलच्या (Google) भागीदारीत एका शानदार स्मार्टफोनची निर्मिती केली आहे. नवा स्मार्टफोन कमी किंमतीत लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (President of Reliance Industry Mukesh) यांनी दिली.Also Read - JioPhone Next यूजर्ससाठी खूशखबर! या दिवशी लॉन्च होईल सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन

मुकेश अंबानी हे रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोतल होते. ते म्हणाले, Google आणि Jio चा नवा स्मार्टफोन गणेश चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबरला लॉन्च होईल. जियोफोन नेक्स्ट (JIOPHONE NEXT) असं या फोनचं नाव आहे. Also Read - Antilia Case: परमबीर सिंह गेले कुठे? अटकेच्या भीतीनं देश सोडून विदेशात गेल्याचा संशय

‘मला ही घोषणा करताना आनंद होतो, की Google आणि Jioनं भागीदारीत एक शानदार स्मार्टफोन – JIOPHONE NEXT डेव्हलप केला आहे. अनेक स्मार्ट फीचर्सनी हा फोन परिपूर्ण असेल.Google आणि Jio च्या Apps ला पूर्णपणे सपोर्ट करेन, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी यावेळी दिली. Also Read - Reliance Jio च्या ग्राहकांना झटका! कोणतीही घोषणा न करता कंपनीनं अचानक घेतला मोठा निर्णय!

Jio आणि Googleने संयुक्त विद्यमानाने तयार केलेला JIOPHONE NEXT स्मार्टफोन Android OS च्या (अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम) एक ऑप्टिमाईझ व्हर्जनवर काम करेन. गणेश चतुर्थीला, 10 सप्टेंबरला हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स जियो आणि गूगलच्या भागीदारीतील नव्या स्मार्टफोन जियोफोन नेक्स्टची (JIOPHONE NEXT) घोषणा केली. नया स्मार्टफोनमध्ये जियो आणि गूगलचे सर्व फीचर्स आणि अॅप असतील. स्मार्टफोनमध्ये शानदार कॅमेरा देण्यात आला आहे. Android OS वर या फोनच काम चालेल. गेल्या वर्षी रिलायन्स जियो आणि गूगलनं करार केला होता.