Google चे लंडनच्या ऑफिसची किंमत ऐकून उडेल तुमची झोप! सुंदर पिचाई यांनी शेअर केला फोटो
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटर गूगलचे लंडनच्या ऑफिसचे फोटोज शेअर केले आहे. आधी भाडेतत्वावर असलेले हे ऑफिस आता गुगलची मालमत्ता झाली आहे.

Google News: गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटर गूगलचे लंडनच्या ऑफिसचे (google new office in London) फोटोज शेअर केले आहे. आधी भाडेतत्वावर असलेले हे ऑफिस आता गुगलची मालमत्ता झाली आहे. (Trending News) गूगलचे आलिशान ऑफिस 408000 वर्ग गेजमध्ये बांधण्यात आले आहे. एका वेळी 10000 कर्मचारी बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
Also Read:
सीईओ सुंदर पिचाई (CEO Sundar Pichai) यांनी ऑफिस खरेदीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, या ऑफिसमध्ये एका वेळेस 10000 कर्मचारी काम करू शकतात. लंडन येथील या ऑफिसमध्ये सध्या 7000 कर्मचारी कार्यरत आहेत. ऑफिसबद्दल माहिती देताना सुंदर पिचाई यांनी सांगितले, की आम्ही या ठिकाणी 2011 मध्ये शिफ्ट झालो होतो. सेंट्रल लंडन येथील सेंट्रल सेंट गेल्सचे रंग जिवंत भासतात. हे ऑफिस ऑक्सफोर्ड रोडपासून अगदी जवळ आहे. ऑफिसला बाहेरून पिवळा, केशरी, लाल व हिरवा रंग देण्यात आला आहे. हे ठिकाण फ्लेक्सिबल वर्कप्लेस होणार असल्याचा दावा देखील यावेळी पिचाई यांनी केला.
View this post on Instagram
अबब 7500 कोटींमध्ये खरेदी…
जगातील मोठी कंपनी म्हणून नावलैकिक प्राप्त असलेल्या गूगलची प्रत्येक गोष्टच निराळी आहे. त्यानुसार लंडन येथील ऑफिसचे खास वैशिष्ट्ये आहे. हे ऑफिस सर्व सुविधांनी सज्ज आहे. यात रेस्टॉरंट, कॅफे, निवासी घरांसह विविध सुविधांचा समावेश आहे. हे भव्य ऑफिस गूगलने 7500 कोटी रुपये मोजून खरेदी केले आहे. कोरोनाच्या काळात जे कर्मचारी घरून काम करत आहेत त्यांना लवकरच परत बोलावण्यात येईल असे संकेत देखील गूगलकडून देण्यात आले आहेत.
लंडनमध्ये मेनचेस्टर येथे तसेच किंग क्रॉस रेल्वे स्टेशनजवळ देखील गूगलचे नवीन ऑफिस तयार होत आहे. दरम्यान गूगलचे फायनान्स ऑफिसर रूथ पोराट म्हणाले की, गेल्या 20 वर्षात लंडन येथून काम करत असताना आम्हाला सन्मानाचा अनुभव आला. यासह या वास्तूला विकत घेणे हे देशाचा विकास व यशाबाबत आमची प्रतिबद्धता दर्शविते. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने न्यूयॉर्कमध्ये आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मेनहट्टन स्थित सेंट जॉन टर्मिनल देखील खरेदी केला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या