Toll Tax on Google Maps: रोड प्रवासादरम्यान आता Google Maps सांगणार किती भरावा लागेल टोल टॅक्स
Google Map लवकरच एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे आणि या अपडेटद्वारे एक विशेष फीचर सादर केले जाणार आहे.

मुंबई: Google Map हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी अॅप्लिकेशन बनले आहे. प्रवास करणाऱ्या युजर्समध्ये हे फीचर खूप लोकप्रिय आहे. Google Map च्या मदतीने नवीन ठिकाणी जाणे आणि मार्ग शोधणे अत्यंत सोपे होते. Google Map मध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत जे प्रवासादरम्यान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जसे की Google Map तुम्हाला वाटेत ट्रॅफीकविषयी माहिती देते आणि शॉर्टकट देखील सांगते. कुठेही जाताना तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे Google Map मुळे तुम्हाला आधीच कळू शकते. याप्रमाणेच Google Map लवकरच एक अतिशय खास आणि उपयुक्त फीचर घेऊन येणार आहे. यामुळे तुम्हाला रोड ट्रिप करताना आणि रोड ट्रिपचे नियोजन करताना याचा अत्यंत उपयोग होऊ शकेल. चला तर जाणून घेऊयात या फीचरविषयी…
Also Read:
- Most Searched Topics on Google: गूगलवर यावर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आले 'हे' टॉपिक, तुम्हीही केले का?
- World Mental Health Day 2022 : नैराश्येत लोकं गुगलवर सर्वाधिक या गोष्टी सर्च करतात?, घ्या जाणून!
- प्रतीक्षा संपली! Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro अखेर भारतात लॉन्च; प्री-बुकिंगवर मिळेल कॅशबॅक, जाणून घ्या सर्व डिटेल्स!
Google Map लवकरच एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे आणि या अपडेटद्वारे एक विशेष फीचर सादर केले जाणार आहे. जे लोक कुठेही प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत, त्यांच्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण प्रवासाला जाण्यापूर्वी Google Map तुम्हाला सांगेल की तुम्हाला कोणत्या रस्त्यांवर आणि महामार्गांवर टोल भरावा लागेल. तसेच किती टोल टॅक्स आकारला जाईल याचीही माहिती हे फीचर देणार आहे. त्यामुळे या फिचरच्या मदतीने तुम्हाला ट्रिपवर जाताना किंवा ट्रिपचे नियोजन करताना मार्गात येणाऱ्या टोलवर किती टोल टॅक्स भरावा लागेल याची माहिती मिळू शकणार आहे. (Road Toll Tax on Google Maps : Now Google Maps will tell you how much toll tax you have to pay during the road trip, Google, Google Maps,)
Google कंपनीने अद्याप या फीचरविषयी कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. परंतु रिपोर्टनुसार गुगलने Google Map च्या या फीचर्सवर काम सुरू केले आहे आणि ते सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे यूजर्संना या फीचरसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या फिचरच्या मदतीने प्रवासादरम्यान किंवा प्रवासावर जाण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या रस्त्यावर किती टोल टॅक्स भरावा लागेल याची माहिती मिळूी शकणार आहे. तसेच यामुळे तुमचा बराच वेळही वाचू शकेल. (Road Toll Tax on Google Maps : Now Google Maps will tell you how much toll tax you have to pay during the road trip, Google, Google Maps,)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या