आता पेमेंट करणे अधिक सोपे, Google Pay ने UPI साठी सुरू केली Tap To Pay सेवा
Google Pay-Tap To Pay Feature: सध्या डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची युजर्समध्ये क्रेझ आहे. कारण याद्वारे तुम्ही कधीही कुठेही चुटकीसरशी पैसे ट्रान्सफर करू शकता. अशा परिस्थितीत आता Google Pay ने UPI साठी टॅप टू पे सेवा लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Google Pay-Tap To Pay Feature: सध्या डिजिटल पेमेंट (Digital Payment) आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची (Online Transaction) युजर्समध्ये क्रेझ आहे. कारण याद्वारे तुम्ही कधीही कुठेही चुटकीसरशी पैसे ट्रान्सफर करू शकता. अशा परिस्थितीत आता Google Pay ने UPI साठी टॅप टू पे सेवा (Tap To Pay) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यामुळे युजर्संचा वेळ वाचणार आहे. Google Pay ची आपल्या वापरकर्त्यांसाठी ही एक उत्तम भेट मानली जात आहे.
Also Read:
आत्तापर्यंत टॅप टू पे सेवा फक्त कार्डसाठी उपलब्ध होती. म्हणजेच कार्डने पेमेंट करताना कार्ड टॅप होताच पेमेंट होते. त्यासाठी पीन टाकण्याची गरज नसते. यामुळे वेळेची बचत होते. आता Google Pay वापरकर्ते देखील या खास सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. रिपोर्टनुसार Google Pay युजर्संना पेमेंट करण्यासाठी POS टर्मिनलवर त्यांचा फोन टॅप करणे आणि त्यांचा UPI पिन वापरून त्यांच्या फोनवरून पेमेंटचे करावे लागेल. QR कोड किंवा UPI शी लिंक केलेला मोबाइल नंबर स्कॅन करणे किंवा प्रविष्ट करणे या प्रक्रियेच्या तुलनेत ही नवी सेवा तात्काळ असेल.
गुगल पीएसी बिजनेस हेड – Google Pay आणि Next Billion User Initiatives सजीथ शिवनंदन यांनी एका निवेदनात म्हटले की “भारतातील Fintech चा विकास जगासाठी प्लेबुक लिहित आहे. यूपीआयसह रीअल-टाइम पेमेंट प्रक्रिया सक्षम करण्यासह व्यवहाराचा वेळ जवळजवळ शून्यावर कमी करत आहे. UPI साठी टॅप-टू-पे चा उच्च ट्रॅफिक असलेल्या रिटेल आउटलेटवर खोल परिणाम होतो. क्यूआर कोड स्कॅन करण्याचा त्रास आता कमी होण्याच्या मार्गावर आहे आणि POS वर डिजिटल पेमेंटमुळे कार्ड पेमेंट देखील मागे पडत आहे.
देशभरातील कोणत्याही Pine Labs Android POS टर्मिनलचा वापर करून व्यवहार करण्यासाठी NFC-Android स्मार्टफोन वापरणाऱ्या कोणत्याही UPI यूजर्ससाठी ही सेवा उपलब्ध असेल. हे रिलायन्स रिटेलसह लॉन्च करण्यात आले होते आणि आता ते फ्यूचर रिटेल आणि स्टारबक्स सारख्या इतर मोठ्या व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध असेल.