Top Recommended Stories

Google Search Tips: गुगलवर अजिबात सर्च करू नका या चार गोष्टी, महागात पडू शकते छोटी चूक

Google Search Tips: इंटरनेट या काळात Google हे नाव जवळपास सर्वांनाच माहीत आहे. गुगल सर्च इंजिनचा वापर प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येथे सहज मिळते.

Published: March 29, 2022 4:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Google पर मिलेगी हर जानकारी
Google पर मिलेगी हर जानकारी

Google Search Tips: इंटरनेट या काळात Google हे नाव जवळपास सर्वांनाच माहीत आहे. गुगल सर्च इंजिनचा (Google India) वापर प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य (Google Tips) म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येथे सहज मिळते. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्याला काही शोधायचे असते तेव्हा आपण थेट Google उघडतो. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की काही गोष्टी अशा देकील आहेत ज्या Google वर सर्च (Google Search) केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. Google वर सर्च केलेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला तुरुंगात देखील जावे लागू शकते. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 4 गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या Google वर सर्च करणे टाळले पाहिजे.

चित्रपट पायरसी

काही चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि कधी कधी ते लीक देखील होतात. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेपूर्वी ऑनलाइन लीक करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लीक झालेला म्हणजेच पायरसी चित्रपट डाउनलोड केला तर तो गुन्हा आहे. भारत सरकारच्या या कायद्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

You may like to read

चाइल्ड पोर्न

भारतासह अनेक देशांमध्ये चाइल्ड पॉर्न हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि भारत सरकार चाइल्ड पॉर्नबाबत अतिशय कडक आहे. चाइल्ड पॉर्नशी संबंधित नियमांचे उल्लंघन करून अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्यास तुरुंगवास भोगावा लागू शकतो. POCSO X 2021 च्या कलम 14 अंतर्गत चाइल्ड पॉर्न पाहणे आणि शेअर करणे हे दोन्ही प्रमुख गुन्हे आहेत.

बॉम्ब बनवण्याची पद्धत

गुगलवर काहीही शोधून ते सहज सापडते. पण चूकनही बॉम्ब बनवण्याची पद्धत शोधू नका. कारण बॉम्ब बनवण्याची पद्धत किंवा इतर तत्सम माहिती शोधल्याबद्दल तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या सिस्टमचा तपशील आणि IP पत्ता पोलिस आणि तपास यंत्रणांपर्यंत पोहोचतो.

खाजगी फोटो आणि व्हिडिओ

सोशल मीडिया किंवा गुगलवर एखाद्याचा खासगी फोटो किंवा व्हिडिओ लीक करणे हाही गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे असे कोणतेही काम चुकूनही करू नका. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>