
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Government Job: बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉचे (LLB) शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरीच्या (Sarkari Job) शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. एलएलबीचे शिक्षण घेत वकील झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी असते. सरकारी वकील म्हणून ते राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये (Government) काम करू शकता. तुम्हाला सरकारी वकील (Public Prosecutor) व्हायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सरकारी वकील बनण्यासाठी कोणती परीक्षा (Exam) द्यावी लागते आणि काय आहे प्रक्रिया (Process)…
बॅचलर -ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉचे (LLB) शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे सरकारी वकील होऊ शकतात. त्यानुसार पहिल्या प्रकारात एपीओ परीक्षा (APO Exam) तर दुसऱ्या प्रकारात अनुभवाच्या आधारे सरकारी वकीलाची (Public Prosecutor) निवड केली जाते. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सरकारी वकीलांची नियुक्ती वेगवेगळ्या नावाने आणि पदांवर केली जाते. केंद्र सरकारसाठी कायदेशीर मुद्दा ऍटर्नी जनरल हाताळतात. तर राज्य सरकारच्या वकीलाला ऍडव्होकेट जनरल म्हणतात.
एपीओ परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. या तीन टप्प्यात उमेदवाराला यश मिळविणे बंधनकारक असते.
– प्रारंभिक परीक्षा (Prelims Exam)
– मुख्य परीक्षा (Mains Exam)
– मुलाखत (Interview)
अनुभवाच्या आधारावर तुम्ही सरकारी वकील बनू शकता. यासाठी सुप्रसिद्ध वकील असण्याबरोबरच किमान सात वर्षाचा अनुभव आणि किमान 35 वर्षे वयाची अट आहे. त्यानुसार सरकारद्वारे ही निवड केली जाते. सरकार बदलल्यास नवे सरकार सरकारी वकील बदलू शकतात. सरकारी वकील यांना त्यांचा अनुभव आणि खटल्यांच्या आधारवर फी दिली जाते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या