Top Recommended Stories

Gujarat Riots: गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा दिलास, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

Gujarat Riots: गुजरातमध्ये सन 2002 मध्ये (Gujarat Riots 2002 Case) उसळलेल्या दंगलप्रकरणी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधातील याचिका फेटाळली आहे. पंतप्रधान मोदींना क्लीन चिट (PM Modi Clean Chit) देण्याऱ्या एसआयटीच्या अहवालाला आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

Published: June 24, 2022 12:02 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Narendra Modi, Mahakali temple, Panchmahal, PM Modi, dargah, Gujarat,
नया मंदिर परिसर 30,000 वर्ग फीट, 125 करोड़ से पुनर्विकास

Gujarat Riots: गुजरात दंगलप्रकरणी (Gujarat Riots Case) सुप्रीम कोर्टाने देशाचे पंतप्रधान आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मोठा दिलासा दिला आहे. सु्प्रीम कोर्टाने पंतप्रधानांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. सन 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. याबाबत एसआयटीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट (PM Modi Clean Chit) दिली होती. मात्र,काँग्रेस नेते एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीच्या अहवालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.आता सुप्रीम कोर्टाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने पंतप्रधानांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Also Read:

सु्प्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले, की ही याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही. गुजरात दंगल प्रकरणी एसआयटीने 2012 मध्ये सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला होता. एसआयटीने दिलेला अहवाल कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने जाफरी यांची याचिका फेटाळली आहे. गोध्रा हत्याकांडानंतर जातीय दंगली भडकवण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुठलाही कट नव्हता, असे एसआयटीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

You may like to read

दरम्यान, सु्प्रीम कोर्टाने 9 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. सु्प्रीम कोर्टाचा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

कोण आहेत झाकिया जाफरी?

गुलबर्गा सोसायटीत झालेल्या दंगली काँग्रेस नेते एहसान जाफरी यांची हत्या झाली होती. झाकिया जाफरी या एहसान जाफरी यांची पत्नी आहेत. या दंगलीप्रकरणी एसआयटीने दिलेल्या अहवालाला झाकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने झाकिया यांची याचिका फेटाळून एसआयटीचा अहवाल योग्य असून ही याचिका ठेवण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या