चंदीगड: हरियाणा (Haryana) राज्यातील रेवाडी (Rewari) शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्येच्या मंदिरातच म्हणजेच शाळेत 7 मुलांनी एका 10 वर्षाच्या मुलीला वासनेची शिकार (Gang Rape) केलं आहे. घटनेचा व्हिडिओ (Video Viral) पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. धक्कादायक म्हणजे 7 आरोपींपैकी 6 जण अल्पवयीन आहे. ते  केवळ 10 ते 12 वयोगटातील आहे. Also Read - Viral Video : युजवेंद्र चहल डान्समध्ये पत्नी धनश्री वर्माला देतोय टक्कर; पाहा व्हिडिओ

मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात रेवाडी येथील एक शाळेत 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. एका आरोपीनं मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट केला होता. आरोपीमध्ये 6 जण हे अल्पवयीन आहेत. त्यांचं वय केवळ 10 ते 12 वर्षांच्या आतील आहे. Also Read - नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून निर्घृण हत्या, निर्दयी आईनं केली मदत

पोलिसांनी सांगितलं की, ही घटना 24 मे रोजी घडली होती. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद होती. मात्र, पीडित मुलगी तिच्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात खेळण्यासाठी गेली होती. या दरम्यान आरोपींनी मुलीला आपल्या वासनेसचं शिकार बनवलं. एवढंच नाही तर एका आरोपीनं या घटनेचा मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पीडितेच्या वडिलांच्या मोबाइलवर पोहोचल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेवून तक्रार दाखल केली. Also Read - Sushant Singh Rajput च्या आठवणीत Ankita Lokhande ने शेअर केला व्हिडिओ; चाहते भावुक


रेवाडीचे DSP हंसराज म्हणाले, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीचं गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एक आरोपी संज्ञान असून 6 जण अल्पवयीन आहेत. संज्ञान आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या मुलानेच घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. 24 मे रोजी ही घटना घडली होती. आरोपींनी शाळेतच अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. नंतर घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.