Top Recommended Stories

Heat Wave : हवामान बदलामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटा तिप्पट वाढणार, UNDRR चा इशारा

Heat Wave : हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात पृथ्वीवरील नैसर्गिक संकटांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा दावा केला आहे.

Updated: April 27, 2022 8:19 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Heat Wave Latest Update
A heat wave warning has been announced for Rajasthan, Delhi, Haryana, UP and Odisha.

Heat Wave warning : जागतिक हवामान बदलामुळे (Climate Change News) पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक संकटांची (Natural Disasters) संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने (United Nations) नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात (UN Report) केला आहे. या अहवालानुसार सन 2030 पर्यंत जगाला दरवर्षी 560 आपत्तींचा सामना करावा लागेल. सध्या 2015 पासून जग वार्षिक 400 संकटांचा सामना करत आहे. या अहवालानुसार सन 2001 च्या तुलनेत सन 2030 मध्ये उष्णतेच्या लाटांचं प्रमाण (Amount Of Heat Waves) 3 पट वाढेल. यामुळे दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांत 30 टक्के वाढ होण्याचा अंदाज देखील यूनोने व्यक्त केला आहे.

युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या (UNDRR) अहवालात 1970 ते 2000 सालापर्यंत आपत्तीची वार्षिक संख्या 90 ते 100 च्या आसपास होती. ही मध्यम ते मोठ्या प्रमाणावरील संकटांची आकडेवारी आहे. 2030 पर्यंत यात अधिक वाढ होणार आहे. उष्णतेच्या लाटांचे (Heat Wave) प्रमाण देखील 3 पटीने वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये तापमानाने 121 वर्षातील उच्चांक मोडला होता. हवामान बदलामुळे केवळ नैसर्गिक संकटच नाही तर कोरोना साथीचा आजार, अन्नधान्याचा तुटवडा देखील जाणावत आहे. हवामान बदलामुळे हे सर्व घडत असल्याचे मत संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

You may like to read

यूएनडीआरआरच्या प्रमुख मिज्युटरी यांच्यानुसार नैसर्गीक संकटामुळे किती नुकसान सहन करावे लागेल याची लोकांना कल्पना नाही. भविष्यात येणार्‍या या भयावह संकटांचा सर्वाधिक फटका गरीब देशांतील नागरिकांना बसेल. या देशांना आपत्तीतून सावरण्यासाठी लागणारा पैसा गोळा करता येणार नाही आणि त्याचा या देशांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसेल असे या संशोधनात सहभागी हॉवर्ड म्यूमॅनेटेरियन इनिशिएटीव्हचे मार्कस इनेकनेल यांचे मत आहे. तर यूएस नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे वैज्ञानिक रॉजर पूलव्हर्टी यांनी संगितले की अनेक आजारांमुळे रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होणे, जंगलातील वणव्यांसह उष्ण वारे वाहणे व युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य व इंधन तुटवडा निर्माण होणे हेही एक संकटच आहे. यामुळे अनेक देश उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

पूलव्हर्टी यांच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूत घट नोंदवण्यात येत होती. परंतु मागील 5 वर्षांपासून हा आकडा वाढताना दिसत आहे. मिज्युटोरी यांच्यानुसार यामागे कोरोना महामारीचे एक मोठे कारण आहे. तसेच त्यांनी चक्रीवादळ किंवा भूकंपाचे मोठ्या संकटात रुपांतर नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.