Top Recommended Stories

HIV Patient: लॉकडाऊनमध्ये देशातील सर्वाधिक एचआयव्ही बाधित महाराष्ट्रात, आंध्रप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर!

HIV Patient: मध्य प्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते (RTI Activist) चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआयला उत्तर देताना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशनने ही माहिती दिली आहे. एनएसीओने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra) एचआयव्हीचे सर्वाधिक प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात 10,498 एचआयव्ही बाधितांची नोंद झाली आहे.

Published: April 28, 2022 11:52 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

HIV
HIV

HIV Patient: कोरोना महामारीच्या (Corona Virus) काळात अनेकांचे संसार आणि आयुष्य उद्धवस्त झाले. महामारीच्या काळात असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जगणं मुश्किल झाले होते. या कठिण काळात असुरक्षित लैगिंग कृतींमुळे देशभरामध्ये जवळपास 85 हजारांपेक्षा अधिक लोकांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे एचआयव्ही बाधितांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक प्रकरणं आहेत. आरटीआयमधून (RTI) ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Also Read:

मध्य प्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआयला उत्तर देताना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशनने ही माहिती दिली आहे. एनएसीओने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या महाराष्ट्रात एचआयव्हीचे सर्वाधिक प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात 10,498 एचआयव्ही बाधितांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेशमध्ये 9,521 रुग्णांची नोंद झाली असून आंध्रप्रदेश देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

You may like to read

कर्नाटकमध्ये 8,947 एचआयव्ही बाधितांची नोंद झाली असून कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मध्य प्रदेश 3,037 आणि पश्चिम बंगालमध्ये 2,757 एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली आहे. एनएसीओने दिलेल्या माहितीनुसार, 2011-12 ते 2020-21 या कालावधीमध्ये असुरक्षित लैंगिक क्रियांमुळे नोंदवलेल्या एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. 2011-12 या कालावधीमध्ये रुग्णसंख्या 2.4 लाखांवर होती. तर 2019-20 मध्ये रुग्णसंख्या 1.44 लाखांवर नोंदवली गेली होती. त्यानंतर आता 2020-21 मध्ये ही रुग्णसंख्या 85, 268 वर घसरली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 11:52 AM IST