मुंबई: कोरोना काळात अनेक लोकांचा रोजगार गेला. त्यामुळे घरांच्या विक्रीतही लक्षणीय घट झाली. अशा परिस्थितीत घरांची विक्री वाढवण्यासाठी बँकांकडून मोठ्या आणि आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्हाला देखील सणासुदीच्या काळात घर खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात कर्ज देणाऱ्या मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत.Also Read - SBI Car Loan: आनंदाची बातमी ! SBIने कार लोन ग्राहकांना प्रोसेसिंग फीवर दिली 100 टक्के सूट

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 6.7 टक्के व्याज दराने प्रथमच गृहकर्ज देत आहे. मात्र लोकांचा क्रेडिट स्कोअर पाहून हे कर्ज देण्यात येत आहे. कर्जाच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही. एसबीआयचे गृहकर्ज घेऊन तुम्ही 30 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत घर खरेदी करू शकता.

स्टेट बँकेकडून सर्वोत्तम ऑफर

यापूर्वी एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज घ्यावे लागत असेल तर एसबीआयने व्याजदर 7.15 टक्के ठेवला होता. जर आपण खाजगी क्षेत्रातील येस बँकेबद्दल बोलायचे झाल्यास Yes Bank ने देखील गृह कर्जावरील व्याज दर 6.7% पर्यंत कमी केले आहे. मात्र येस बँकेने ही ऑफर फक्त सणासुदीच्या काळात मर्यादित काळासाठी सादर केली आहे.

गृहकर्जावर 6.7 टक्के व्याज दर

सणासुदीच्या काळात सात बँका आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने ग्राहकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. एचएसबीसी बँक आणि येस बँकही आता स्वस्त गृहकर्ज देत आहेत. खाजगी क्षेत्रातील एचएसबीसी बँकेने गृह कर्जाचा व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी करून 6.45 टक्के केला आहे. ही ऑफर गृहकर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी आहे. हा व्याज दर बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याज दरापैकी एक आहे. नवीन गृहकर्जासाठी एचएसबीसी बँक 6.70 टक्क्यांपासून व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB) गृहकर्ज

खरं तर सध्या जवळजवळ सर्व बँका झिरो प्रोसेसिंग फीस आणि सवलतीच्या व्याज दर गृहकर्ज देत आहेत. सणासुदीच्या काळात घरे खरेदी करणाऱ्या लोकांना ही मोठी सुविधा होऊ शकते असे बँकांचे मत आहे. पंजाब नॅशनल बँकेने 50 लाख रुपयांवरील गृहकर्जावरील व्याजदर 6.6% पर्यंत कमी केला आहे. पीएसयू बँकांमधील हा सर्वात कमी व्याज दर आहे. कोटक महिंद्रा बँकेने 6.50 टक्के व्याजाने होम लोन कर्ज दिले आहे.

बँकेचे नाव, व्याज दर, प्रोसेसिंग फीस

SBI 6.70% शून्य
PNB 6.60% शून्य
BoB 6.75% शून्य
ICICI Bank 6.70% 1100 रुपयांपासून सुरू
HDFC 6.70% शून्य
Kotak Mahindra Bank 6.50% शून्य
Yes bank 6.70% (31 डिसेंबरपर्यंत) शून्य
HSBC bank 6.70% शून्य