अजमेर: प्रेमाला वयाचं आणि वेळेचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. अशीच एक घटना राजस्थानातील अजमेर (Ajmer) शहरात घडली आहे. एका शिक्षकाचा त्याच्या क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर जीव जडला. इतकंच नाही तर शिक्षक आणि मुलगी दोन दिवस गायब होते. मात्र, ही भानगड मुलीच्या नातेवाईकांना माहित होताच प्रेमात पार बुडालेल्या शिक्षकानं मुलीसोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव थोडक्यात बचावला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. राहुल गांधी (वय-29, रा. अजमेर) असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.Also Read - Thane News : धक्कादायक! भात शिजवला नाही म्हणून झालं भांडण, पतीने केली पत्नीची निर्घण हत्या

अजमेर शहरातील गंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत (Ganj Police Station) हा प्रकार घडला आहे. ट्यूशन शिक्षक राहुल गांधी (Tuition Teacher Rahul Gandhi) हा त्याच्या क्लासमधील 15 वर्षीय विद्यार्थिनीच्या प्रेमात अक्षरश: वेडापिसा झाला होता. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला फूस लावून राहुल यांन बोराच्या डोंगरावर बोलावलं. तिच्यासोबत तिथं दोन दिवस घालवले. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Also Read - Palmistry : चाळीशीनंतर वेगाने प्रगती करतात 'हे' लोक! हातावरील विशिष्ट चिन्हे चमकवतात नशीब

पोलिस उपनिरीक्षक रघुवीर प्रसाद शर्मा (Raghuveer Prasad Sharma) यांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी ट्यूशन शिक्षक राहुल गांधी (Rahul Gandhi) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आपल्या अल्प वयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. Also Read - Shikhar Dhawan : शिखर धवनला वडिलांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बोराजच्या डोंगरावर आरोपी शिक्षक आणि मुलगी सापडून आली मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी मुलगी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी गंज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. परंतु ट्यूशन शिक्षक राहुल आणि मुलगी सापडली नाही. शेवटी एका फुटेजमध्ये दोघे बोराजच्या डोंगराकडे जाताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी डोंगरावर सर्च ऑपरेशन सुरू केलं. दुसऱ्या दिवशी आरोपी शिक्षक आणि मुलगी सापडले.

..आणि सापडली सुसाइड नोट!

पोलिसांनी आरोपी राहुल गांधी याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवलं आहे. आरोपीकडे सुसाइड नोट (Suicide Note) आढळून आली आहे. पोलिसा आरोपीची कसून चौकशी करत आहे. आरोपी आणि मुलीनं स्वइच्छेनं सुसाईड करण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अल्पवयीन असल्यानं तिच्याशी विवाह करू शकत नाही. पण तिच्यासोबत जीव तर देऊ शकतो, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर पोलिस आरोपीला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.