लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) संतापजनक घटना घडली आहे. आधी कोरोनामुळे (Corona) पतीचे निधन झाले या दु:खातून सावरत नाही तोवर या महिलेवर तिच्या दिराने बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिराविरोधात तक्रार दाखल केली. याचा राग मनात धरुन पोलिस स्टेशनवरुन (Police Staion) घरी आल्यानंतर या महिलेला दिराने आणि त्याच्या बहिणीने बेदम मारहाण केली. रस्त्यावर या महिलेला पळवून पळवून दोघांनी मारहाण केली. या घटनेचा व्हडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral video) झाला होता.Also Read - Viral Video: तुम्ही सुद्धा नाश्त्याला टोस्ट खाताय?, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाणं बंद कराल!

कानपूरच्या विनायकपूरमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेच्या पतीचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Corona) 26 मे रोजी निधन झाले होते. या महिलेला आठ वर्षांचा मुलगा देखील आहे. पतीच्या निधनानंतर या महिलेवर तिच्या दिराचा डोळा होता. ती एकटी असल्याचा फायदा उचलत दिराने या महिलेवर बलात्कार (Rape case) केला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल घेतली. पोलिस ठाण्यातून घरी आल्यानंतर पीडित महिलेच्या दिराने आणि त्याच्या बहिणीने तिला आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेचा दिर आणि त्याच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला. Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

महत्वाचे म्हणजे, ही महिला ज्यावेळी पोलिस ठाण्यात (Uttar Pradesh Police) दिराने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती तेव्हा पोलिसांनी आधी तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यांनी तिला हे प्रकरण आपापसात मिटवून टाकण्याचा सल्ला दिला. पीडित महिलेवर पोलिसांनी दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू हे प्रकरण डीसीपींकडे (DCP) पोहचल्यानंतर पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिराविरोधात आणि त्याच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन डीसीपींनी दिले आहे. Also Read - Rajasthan Rape Case: मन सुन्न करणारी घटना! 19 वर्षांच्या तरुणाने आजीची हत्या करुन मृतदेहावर केला बलात्कार!