IAF Group C Recruitment 2021 : इंडियन एअर फोर्समध्ये ग्रुप-सी पदांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज, जाणून घ्या पात्रता

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी पास उमेदवारांना हवाई दलात नोकरी मिळवण्याची संधी आहे. भारतीय हवाई दल , मुख्यालय प्रशिक्षण कमांडने ग्रुप-सी सिव्हील पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Updated: January 15, 2022 8:31 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IAF Group C Recruitment 2021 : इंडियन एअर फोर्समध्ये ग्रुप-सी पदांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज, जाणून घ्या पात्रता

IAF Group C Recruitment 2021 Notification: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी पास उमेदवारांना हवाई दलात नोकरी मिळवण्याची संधी आहे. भारतीय हवाई दल (IAF), मुख्यालय प्रशिक्षण कमांडने (HQ Training Command) ग्रुप-सी सिव्हील पदांसाठी (कुक) अर्ज मागवले आहेत. ही भरती एअर ऑफिसर कमांडिंग एएफ बिडर आणि कमांडंट एअर फोर्स अकॅडमी हैदराबादच्या अंतर्गत होईल.

Also Read:

एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये अधिसूचना जारी झाल्यापासून (18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2021) 30 दिवसांच्या आत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. उच्छक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या http://davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10801_31_2122b.pdf लिंकवर जाऊन भरती संदर्भातील संपूर्ण अधिसूचना वाचावी असे आवाहन करण्यात आले आहे.

IAF Group C Recruitment 2021-22 : महत्‍वाच्या तारखा

एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

IAF Group C Recruitment 2021-22 : किती असेल पगार?

भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार 19,900 ते 63,200 रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळेल.

IAF Group C Recruitment 2021-22 : आवश्यक पात्रता

या पदांसाठी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. 18 ते 28 वयोगटातील OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार अर्ज करू शकतात. तर 18 ते 30 वयोगटातील SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.

IAF Group C Recruitment 2021-22: निवड प्रक्र‍िया

निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांसाठी निवड केली जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 8:30 PM IST

Updated Date: January 15, 2022 8:31 PM IST