Top Recommended Stories

IB Recruitment 2022: IB मध्ये नोकरीची संधी, दरमहा 1.51 लाख रुपये पगार, जाणून घ्या पात्रता

IB Recruitment 2022: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक आणि केअरटेकर या पदांवर भरतीची जाहिरात जाहीर आहे.

Published: July 25, 2022 3:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IB मध्ये नोकरीची संधी, दरमहा 1.51 लाख रुपये पगार, जाणून घ्या पात्रता
IB मध्ये नोकरीची संधी, दरमहा 1.51 लाख रुपये पगार, जाणून घ्या पात्रता

IB Recruitment 2022: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक आणि केअरटेकर या पदांवर भरतीची जाहिरात जाहीर आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज (How to Apply for IB Recruitment 2022) सादर करू शकतात. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये 23 जून रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतून एकूण 766 पदे भरायची आहेत.

आवश्यक पात्रता आणि निकष (Eligibility Criteria)

केंद्रीय पोलीस संघटना किंवा राज्य पोलीस संघटना किंवा संरक्षण दलातील अधिकारी IB भर्ती 2022 साठी अर्ज करू शकतात. IB भर्ती परीक्षा 2022 साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांकडे IB ACIO अधिसूचना 2022 मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक पात्रता निकष असणे आवश्यक आहे. या पदांवरील भरतीसाठी पात्रता आणि निकष जाणून घेण्यासाठी तसेच अधिकृत अधिसूचना तपासण्यासाठी उमेदवार थेट या लिंकवर https://www.mha.gov.in/sites/default/files/VACANCYCIRCULARIB_04072022.pdf क्लिक करू शकतात.

You may like to read

असा करा अर्ज (How to Apply)

ज्या इच्छुक आणि पात्र अधिकाऱ्यांनी मागील प्रतिनियुक्तीपासून 3 वर्षांचा कुलिंग-ऑफ कालावधी पूर्ण केला आहे आणि ज्यांनी यापूर्वी 1 पेक्षा जास्त प्रतिनियुक्ती केलेली नाही ते आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारंनी अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवावा.

या पत्त्यावर पाठवा अर्ज : सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 (the Assistant Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021) या पत्त्यावर तुमचा अर्ज 19 ऑगस्टपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

किती मिळेल पगार?

सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी (ग्रुप बी) यांना 7 व्या वेतन आयोगानुसार 47,600 रुपये प्रति महिना ते 1,51,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी यांना दरमहा 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना पगार मिळेल. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी यांना दरमहा 29,200 रुपये ते 92,300 रुपये प्रति महिना पगार मिळेल.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>