मुंबई : एटीएममधून (ATM) पैसे काढताना बऱ्याचदा तुमच्या हातामध्ये फाटक्या नोटा (Torn Note) येत असतील. फाटकी नोट मिळाल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. नोट फाटकी असल्यामुळे तिला चलना वापरणे खूप अवघड असते कारण कोणी फाटकी नोट घेत नाही. नोट फाटकी असेल आणि ती कोणी घेत नसेल तर तुम्हाला ती बँकेत (Bank) घेऊन जावी लागते. पण बऱ्याचदा बँक देखील या नोटा स्वीकार करण्यास नकार देतात. जर तुमच्यासोबत देखील असं झालं असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने (RBI) लोकांच्या समस्या लक्षात घेऊन समस्येचे निराकरण करण्याचा एक मार्ग शोधला आहे.Also Read - Bank Holidays In September 2021: सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी!

नियमांनुसार, एटीएममधून फाटलेली नोट मिळाल्यानंतर तुम्ही ती थेट बँकेत घेऊन जाऊ शकता. बँक कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगू शकता की, तुमच्या एटीएममधून ही फाटलेली नोट निघाली असून मला ती बदलून द्या. जर बँक फाटलेली नोट बदलून देण्यास नकार देत असेल तर तुम्ही इतर पर्याय अवलंबू शकता. हे पर्याय नेमके काय आहेत त्यावर आपण नजर टाकणार आहोत… Also Read - RBI Credit Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, RBIच्या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा

तुम्हाला एक फॉर्म भरुन द्यावा लागेल –

जर एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल तर तुम्हाला बँकेकडून फॉर्म (Bank Form) घ्यावा लागेल. नोट बदली करुन मिळावी यासाठी तो फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये वेळ (Time), तारीख (Date) आणि कोणत्या एटीएममधून (ATM) तुम्ही पैसे काढले आहे हा तपशील भरुन द्याव लागेल. यासह तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्याची स्लिपही (Slip) द्यावी लागेल. जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुमच्या मोबाईलवर आलेला मॅसेज (Message) त्या फॉर्मसोबत जोडावा लागेल. Also Read - आजपासून Salary, EMI,Pension संबंधीत नियमांमध्ये बदल! तुमच्यावर काय होणार परिणाम?

बँक नियमांचे उल्लंघन करु शकत नाही –

रिझर्व्ह बँकेच्या ‘एक्सचेंज करन्सी रुल्स 2017’नुसार जर तुम्हाला एटीएममधून फाटेलेली नोट मिळाली तर ती नोट बदलून दुसरी नोट देणे ही त्या बँकेची जबाबदारी असते. यासाठी जास्त वेळ लागत नाही.

बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागेल –

आरबीआयच्या नियमांनुसार, कोणतीही बँक एटीएममधून निघालेली फाटलेली नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. यानंतरही जर बँक नियमांचे उल्लंघन (Violation of bank rules) करत असेल तर बँक कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होऊ शकते. त्यासोबत बँकेला 10 हजार रुपयांचा दंडही (fine of Rs 10,000) भरावा लागू शकतो.