नवी दिल्ली: पत्रकारितेचे शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (IIMC) 2021-22 शैक्षणिक सत्रामध्ये आठ पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज  (IIMC Online Application) भरण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 पर्यंत (IIMC Application Last Date) वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2021 होती. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा 29 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल तर परीक्षेचा निकाल 10 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ऑनलाईन अर्ज www.iimc.nta.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

या अभ्यासक्रमांसाठी करू शकता अर्ज (IIMC Application Process )

प्रवेश प्रभारी प्रा. राजेश कुमार यांच्यानुसार आयआयएमसीच्या 6 कॅम्पसमध्ये घेण्यात येणाऱ्या 8 अभ्यासक्रमांच्या 476 जागांसाठी यावर्षी प्रवेश परीक्षा (IIMC Entrance Exam) घेण्यात येणार आहे. हे कॅम्पस नवी दिल्ली, ढेंकनाल, आयझॉल, अमरावती, कोट्टायम आणि जम्मूमध्ये आहेत. आयआयएमसी हिंदी पत्रकारिता, इंग्रजी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि दूरदर्शन, ओडिया, मराठी, मल्याळम आणि उर्दू पत्रकारिता मध्ये पीजी डिप्लोमा अभ्याक्रम आहेत.

NTA घेईल प्रवेश परीक्षा

प्रा. राजेश कुमार यांनी सांगितले की या वर्षी देखील कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) प्रवेश परीक्षा घेतली जाईल. देशातील 25 शहरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाईल. IIMC च्या www.iimc.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेशी संबंधित सर्व माहिती, महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रवेश प्रॉस्पेक्टस देखील उपलब्ध आहेत.

29 ऑगस्ट रोजी होणार प्रवेश परीक्षा

या वर्षी प्रवेश परीक्षा 29 ऑगस्ट 2021 रोजी दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली (IIMC Entrance Exam will be held on 29th August) जाईल. हिंदी पत्रकारिता, इंग्रजी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क आणि रेडिओ आणि दूरदर्शन अभ्यासक्रमांसाठी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत प्रवेश परीक्षा असेल. तर प्रादेशिक भाषा पत्रकारिता अभ्यासक्रमांतर्गत ओडिया, मराठी, मल्याळम आणि उर्दू पत्रकारिता या अभ्यासक्रमांसाठी दुपारी 2 ते 4 या वेळेत प्रवेश परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक परीक्षा दोन तासांची असेल. त्यामध्ये सामान्य ज्ञान आणि माध्यम आणि संप्रेषण क्षेत्रातून 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रादेशिक भाषा पत्रकारिता अभ्यासक्रमात विचारलेले प्रश्न प्रादेशिक भाषेत असतील आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रश्न इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असतील.

एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी करू शकता अर्ज

विद्यार्थी एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना एकच अर्ज भरावा लागेल. परंतु त्यांना अर्ज फॉर्ममध्ये त्यांच्या कोर्सची अनुक्रमे पसंती नमूद करावी लागेल आणि प्रत्येक कोर्ससाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. प्रा. कुमार यानी सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करण्यापूर्वी प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला आहे.

कोण करू शकतो अर्ज

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी IIMC मध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर परीक्षेला बसले आहेत किंवा बसले आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवडीनंतर अशा विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीट किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागेल. या विद्यार्थ्यांनी IIMC च्या कार्यालयात पडताळणीसाठी मूळ पदवी प्रमाणपत्र सादर केले तरच अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना पदविका दिली जाईल.

काय आहे वयोमर्यादा?

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांचा जन्म 1 ऑगस्ट 1996 रोजी किंवा त्यानंतरचा (1 ऑगस्ट, 2021 रोजी जास्तीत जास्त 25 वर्षे) असावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जन्मतारीख 1 ऑगस्ट 1993 रोजी किंवा त्यानंतरची (1 ऑगस्ट 2021 रोजी जास्तीत जास्त 28 वर्षे) असावी. तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी जन्मतारीख 1 ऑगस्ट 1991 रोजी किंवा नंतरची (1 ऑगस्ट, 2021 रोजी जास्तीत जास्त 30 वर्षे) असावी.

ऑनलाईन भरावे लागेल अर्ज शुल्क

अर्ज शुल्क सामान्य श्रेणीसाठी 1,000 रुपये आणि ओबीसी/एससी/एसटी/दिव्यांग/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये आहे. जर विद्यार्थी दोन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करत असेल तर त्याला दोन्ही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे भरता येईल.

10 सप्टेंबर रोजी जाहीर होईल निकाल

प्रवेश परीक्षेचा निकाल 10 सप्टेंबर रोजी IIMC च्या वेबसाइटवर जाहीर केला जाईल. यंदा सत्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल.

अधिक माहितीसाठी येते साधू शकता संपर्क

कोणतीही समस्या असल्यास विद्यार्थी शैक्षणिक विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अरुणा असफ अली मार्ग, नवी दिल्ली -110067 यांच्याशी संपर्क साधू शकतात. याशिवाय आपण दूरध्वनी क्रमांक 011-26742920, 26742940, 26742960 (एक्सटेन्शन 233) वर देखील संपर्क साधू शकता. अर्जदारांना मोबाईल नंबर 9818005590 द्वारे देखील माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे माहिती मिळवायची असेल तर ते मोबाईल नंबर 9871182276 वर संदेश पाठवू शकतात. याशिवाय iimc@nta.ac.in वर ईमेलद्वारे संपर्क साधता येईल. (IIMC Entrance Exam Indian Institute of Mass Communication Entrance Exam date Extension IIMC admission journalism admissions journalism courses journalism Entrance Exam date IIMC Entrance Exam date,)