नवी दिल्ली : 71 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्यावरून देशाला उदे्देशून भाषण केले. मात्र, हे भाषण करत असताना मोदींनी प्रोटोकॉलचा भंग केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यासाठी लाल किल्यावर आले. मोदींना पाहताच उपस्थित नागरीकांची त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यामुळे मग मोदींनीही आपला सरकारी प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि ते थेट लोकांमध्ये गेले.

दरम्यान, लाल किल्ल्या जवळ असलेल्या गर्दीत मोठ्या माणसांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. मोदींना पाहून लहान मुलांनीही त्यांच्याशी हात मिळविण्यासाठी गोंधळ करण्यास सुरूवात केली. लहान मुलांची भावना ओळखून मग मोदीही लहान मुलांजवळ गेले आणि त्यांनी त्या चिमूकल्या हातांकडून शुभेच्छा स्विकारल्या.