नवी दिल्ली : भारतीय वायुदलामध्ये (Indian Air Force) नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी सुवर्धसंधी आहे. भारतीय वायुदलात अधिकारी पदांसाठी भरती (Indian Air Force Recruitment 2021) होणार आहे. वायुदलाने एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टच्या माध्यमातून कमीशन ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज (Indian Air Force Recruitment 2021) करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जून 2021 पासून सुरु होणार आहे. तर 30 जून 2021 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.Also Read - RBI Recruitment 2022: आयबीआयमध्ये विनापरीक्षा मिळवा नोकरी, आत्ताच करा अर्ज, जाणून घ्या पगार

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार थेट या लिंकवर https://afcat.cdac.in/AFCAT/ जाऊन अर्ज करु शकतात. त्यासोबतच ते http://davp.nic.in/WriteReadData/ADS/eng या लिंकवर जाऊन अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Indian Air Force Recruitment 2021) एकूण 334 रिक्त पदं भरली जाणार आहेत. एएफसीएटी प्रवेश, एनसीसी स्पेशल प्रवेश आणि मेट्रोलॉजी अंतर्गत (Indian Air Force Recruitment 2021) ही रिक्त पदं भरली जाणार आहेत. Also Read - OFB Recruitment 2022: ऑर्डनन्स फॅक्टरीत परीक्षेशिवाय नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय हवाई दल भरती 2021 साठी महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 1 जून 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 जून 2021 Also Read - Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्करात 47 पदांसाठी भरती, 10वी पास उमेदवार असे करु शकता अर्ज!

भारतीय हवाई दल भरती 2021 साठी आवश्यक पात्रता

फ्लाइंग ब्रांच

गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 50 टक्के गुणांसह उमेदवार 10+12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात कमीत कमी तीन वर्षांची पदवी असणे गरजेचे आहे. तसंच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह बीई/ बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) शाखा

एरोनॉटिकल इंजिनिअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स) (एई (एल)) – 10+12 मध्ये भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये प्रत्येकी किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग/ तंत्रज्ञानात किमान चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे.

ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) शाखा

प्रशासन – उमेदवार 10+12 सोबत मान्यताप्राप्त विद्याीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दल भरती 2021 साठी आवश्यक वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दल भरती 2021 साठी अर्ज शुल्क

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 250 रुपये फी भरावी लागणार आहे.

भारतीय हवाई दल भरती 2021 साठी मिळणारा पगार

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56,100 ते 1,77,500 रुपयांपर्यंत पगार मिळेल.