
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Indian Army Agniveer Bharti Rally Dates : भारतीय हवाई दलात अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता भारतीय लष्करातही अग्निवीरांची भरती (Indian Army Recruitment 2022) प्रक्रिया सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी भारतीय लष्कर देशातील सर्व राज्यांमध्ये अग्निवीर भरती रॅलीचे (ArmyAgniveer Bharti Rally Dates) आयोजन करत आहे. यासाठी भारतीय लष्कराने संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. आर्मी अग्निवीर भरती (ArmyAgniveer Recruitment 2022) रॅलीचे वेळापत्रक भारतीय सैन्यदलाची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन वेळापत्रक (ArmyAgniveer Recruitment Rally Dates) तपासू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी हे लक्षात घ्या की भरती मेळाव्यासाठी नोंदणीची प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरू होईल. नोंदणीसाठी उमेदवारांना भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या भरती मोहिमेअंतर्गत भारतीय सैन्यातील अग्निवीरांच्या सुमारे 25000 रिक्त जागां भरती केली जाईल. ज्या पदांवर भरती होणार आहे त्यात जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक, ट्रेडसमन (10वी), ट्रेडसमन (8वी) या पदांचा समावेश आहे.
आर्मी अग्निवीर भरती रॅलीसाठी नोंदणी – 1 जुलै 2022 पासून
भर्ती मेळावा आयोजन – दुसरा आठवडा, ऑगस्ट 2022
पहिल्याल्या बॅचची लेखी परीक्षा – 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022
पहिली तुकडी प्रशिक्षण केंद्रात रिपोर्ट करेल – डिसेंबर 2022
दुसऱ्या बॅचच्या लेखी परीक्षेचे आयोजन – जानेवारी 2023
दुसरी तुकडी प्रशिक्षण केंद्रात रिपोर्ट करेल – फेब्रुवारी 2023
अग्निवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षणानंतर युनिटला रिपोर्ट करेल – जुलै 2023
भारतीय सैन्यदलातील अग्निवीर भरती मेळावा कोणत्या राज्यात कधी होणार, पहा येथे..
TENTATIVE_AGNIVEER_RALLY_SCHEDULE_RECRUITING_YEAR_2022_23_1656384409
9921613111
Sable
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या