Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता
Indian Army Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय सैन्यात विविध पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन आर्मीच्या जबलपूर ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरने विविध पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

Indian Army Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukari) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय सैन्यात विविध पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन आर्मीच्या (Indian Army) जबलपूर ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरने विविध पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 10वी पास (10th Pass Jobs) उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इंडियन आर्मीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Also Read:
या भरती प्रक्रियेअंतर्गत टेलर, कुक, न्हावी, सफाई कर्मचारी आणि रेन्ज चौकीदार या पदांवर भरती (Indian Army Jobs 2022) केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज (Government Jobs) करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 28 मार्च 2022 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 मे 2022 आहे.
Indian Army Recruitment 2022 : रिक्त पदांची संख्या
न्हावी – 1 पद
टेलर – 1 पद
रेन्ज चौकीदार – 1 पद
सफाई कर्मचारी – 2 पदे
कुक – 9 पदे
Indian Army Recruitment 2022 : किती मिळेल पगार?
न्हावी (स्तर -1) – दरमहा 18000 रुपये
टेलर (स्तर -1) – दरमहा 18,000 रुपये
रेन्ज चौकीदार (स्तर -1) – दरमहा 18,000 रुपये
सफाई कर्मचारी (स्तर -1) – दरमहा 18000 रुपये
कुक (स्तर -2) – दरमहा 19,900 रुपये
Indian Army Recruitment 2022 : आवश्यक शैक्षणिक पात्रता
न्हावी (स्तर -1) – अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच एक वर्ष व्यावसाय किंवा नोकरीचा अनुभव असावा.
टेलर (स्तर -1) – अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून टेलरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
रेन्ज चौकीदार (स्तर -1)- अर्ज करणारा उमेदवार संबंधित विषयासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा आणि कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव आवश्यक.
सफाई कर्मचारी (स्तर -1) : अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित कामाचा एका वर्षाचा अनुभव असावा.
कुक (स्तर -2) – अर्ज करणारे उमेदवार संबंधित विषयासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण असावेत.
Indian Army Recruitment 2022 : आवश्यक वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात शासकीय नियमानुसार सवलत दिली जाईल. इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षांची तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांना वयात 5 वर्षांची सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्जदारांची निवड ही लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारावर केली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
Indian Army Recruitment 2022 : अर्ज प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असलेले उमेदवार indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करुन अर्ज शकतात. उमेदवारांनी संबंधित सर्व कागदपत्रे आणि तपशीलासह शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. या पदांसाठी 1 मे 2022 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यासाठी पत्ता : कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर (एमपी) पिन – 482001.