Indian Navy Recruitment 2022: नौदलात 10वी पास अणाऱ्यांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज!
Indian Navy Recruitment 2022 : उमेदवार ही भरती जाहीर झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या पदांच्या भरतीसाठी फक्त संरक्षण कर्मचारी अर्ज करू शकतात.

Indian Navy Recruitment 2022: नौदलामध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी आहे. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडने ग्रुप सी पदांसाठी अर्ज (Indian Navy Recruitment 2022) मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे फायरमन (Fireman), फार्मासिस्ट (Pharmacist) आणि पेस्ट कंट्रोल वर्कर (Pest Control Worker) या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात 26 फेब्रुवारी 2022 रोजी रोजगार वृत्तपत्रात (Employment Newspaper ) एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार ही भरती जाहीर झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या पदांच्या भरतीसाठी फक्त संरक्षण कर्मचारी अर्ज करू शकतात.
Also Read:
पदांचा तपशील –
फायरमन-120 पदं
फार्मासिस्ट – 1 पदं
पेस्ट कंट्रोल कर्मचारी – 6 पदं
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अधिसूचना पाहावी लागेल किंवा रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या जाहिरातीतून ते ही माहिती पाहू शकतात.
वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 56 वर्षे असावे.
असा करा अर्ज –
नौदलाच्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी अर्ज भरावा. इतर आवश्यक कागदपत्रांसह फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, टायगर गेट जवळ, मुंबई- 400001 येथे अर्ज पाठवू शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या