सरकारी नोकरीची स्वप्न पाहाणाऱ्या उमेदवारांसाठी सूवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वेनं (Indian Railway) ही संधी उपलब्ध करून दिली आहे. (Indian Railway Recruitment 2021) भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) दक्षिण रेल्वे डिव्हिजनद्वारा (Southern Railway) अप्रेंटिसशिप पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि आवश्यक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. Indian Railway ची अधिकृत वेबसाइट sr.indianrailways.gov.in वर याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे.Also Read - DRDO Recruitment 2022 : 'या' विभागात निघाली 630 पदांसाठी भरती, मिळेल 88,000 हजार रुपये पगार

इच्छुक उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,1618,1796 यावर क्लिक करून (Indian Railway Recruitment 2021) अप्रेंटिसशिप पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशन पाहाण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE वर क्लिक करू शकता. Also Read - LIC AAO Recruitment 2022: LIC मध्ये नोकरीची सूवर्ण संधी, AAO पदासाठी भरतीबाबत जाणून घ्या डिटेल्स

दक्षिण रेल्वे डिव्हिजनमध्ये (Indian Railway Recruitment 2021) एकूण 3378 जागासाठी ही भरती केली जात आहे. त्यापैकी 936 जागा कॅरिज वर्क्स, पेरम्बूर, 756 जागा गोल्डन रॉक वर्कशॉप आणि 1686 सिग्नल आणि टेलीकॉम वर्कशॉप, पोदनूरसाठी आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. Also Read - Waiting Ticket: तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही, सहज मिळू शकते माहिती, जाणून प्रक्रिया

या पदांसाठी आहे भरती-

कॅरिज वर्क्स, पेरम्बूर- 936 जागा
गोल्डनरॉक वर्कशॉप – 756 जागा
सिग्नल आणि टेलिफोन वर्कशॉप – 1686

आवश्यक पात्रता-

– 10 वी पास आणि आयटीआय पास

वय मर्यादा

– 15 ते 24 वर्ष

अर्ज शुल्क

– रु. 100/-
(एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही)

निवड प्रक्रिया-

-उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारावर करण्यात येईल.