Top Recommended Stories

Indian Railways: रेल्वेत 2 एप्रिलपासून सुरु होणार 'ही' सुविधा; जाणून घ्या अधिक माहिती!

Indian Railways: येत्या काही दिवसात चैत्र नवरात्रला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात भाविक देवीची पूजा करता उपवास ठेवतात. अशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच एक सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

Updated: March 25, 2022 11:45 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

indian railways
फोटो के साथ देनी होगी जानकारी
Indian Railways: आर्थिक दृष्टया परवडणारी आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशातील बहुतांश लोकं रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यास प्राधान्य देतात. देशात रेल्वेने (Railways) प्रवास करणारा एक मोठा वर्ग आहे. महिन्याला कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसात चैत्र नवरात्रला (chaitra navaratri) सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात भाविक देवीची पूजा (durga devi puja) करता उपवास ठेवतात. अशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच एक सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जाणून घेऊया त्या सुविधेविषयी…

काय आहे सुविधा

नवरात्री दरम्यान, प्रवास करणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) नवीन सुविधा सुरु केली आहे. नवरात्रचा उपवास असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये बसून त्यांच्या आवडीचे जेवण मागवता येणार आहे. आयआरसीटीसी (IRCTC) येत्या 2 एप्रिल 2022 पासून ही सुविधा सुरु करणार आहे. खास अशा या जेवणामध्ये कांदा-लसूण नसणार. हे जेवण सात्विक आणि शुद्ध असणार आहे. यासह जेवणात साधे मीठ ऐवजी सैंदव मीठ वापरण्यात येणार आहे.

1323 या क्रमांकावर करावी लागेल नोंदणी

या सुविधेंतर्गत लस्सी, फळांचा ताजा रस, भाजी पुरी, भाजी, फळ, चहा, दुग्धजन्य पदार्थ, सुक्या मेव्याची खीर आदी खाद्य पदार्थ प्रवाश्यांना मिळणार आहे. या खाद्यपदार्थांसाठी बुकिंग करावी लागणार आहे. त्यानुसार प्रवाशांना ई-केटरिंग किंवा 1323 या क्रमांकावर कॉल करून आधी ऑर्डर बुकिंग करावी लागणार आहे.

500 ट्रेनमध्ये ही सुविधा

आयआरसीटीसीने सुरु केलेली ही सुविधा एकूण 500 ट्रेनमध्ये असणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सेवा सुरु करण्यात आली असून उपवासाच्या या थाळीची किंमत 125 ते 200 रुपये असणार आहे. ज्या ट्रेनमध्ये जेवणाची व्यवस्था आहे फक्त त्याच ट्रेनमधील प्रवाशांसाठी ही सुविधा मिळणार आहे.

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.