Top Recommended Stories

Indian Railways Facility: रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली खास सुविधा, चालत्या ट्रेनमध्ये घेता येणार तिकीट!

Indian Railways Facility: ऑनलाइन पेमेंट वाढवण्यासाठी रेल्वेने 36 हजारांहून अधिक टीटीईंना पॉइंट ऑफ सेल मशीन दिल्या आहेत. या मशिनच्या माध्यमातून आता रेल्वे अधिकाऱ्यांना रोख रक्कम न भरता प्रवाशांना सहज तिकीट देता येईल.

Published: July 26, 2022 6:06 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

indian railways, IRCTC update, cancelled trains today IRCTC, indian railways cancelled train, live train status, indian railways cancelled train list, train list cancelled, trains cancelled today, trains cancelled list, cancelled train list September 13, trains cancelled, IRCTC latest news, IRCTC September 13, trains cancelled list today,trains cancelled list September 13, cancelled train, IRCTC news today, IRCTC Update today, indian railways booking, indian railways gov.in, railways, railways ticket, railways news, railways general ticket, IRCTC Tuesday, trains cancelled Tuesday, cancelled trains, Cancelled trains today, IRCTC, IRCTC news today, IRCTC Update today, indian railways booking, indian railways gov.in, railways, railways ticket, railways news, railways general ticket, IRCTC Tuesday, trains cancelled tuesday, IRCTC Updates
As per the update shared by the railways, 214 trains scheduled to depart on September 13 were fully cancelled while 76 trains were partially cancelled. (File Photo)

Indian Railways Facility: प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे (Indian Railways ) वेळोवेळी नवनवीन सुविधा आणत असते. आता पुन्हा एकदा रेल्वेने प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. प्रवाशांना आता रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी किंवा दंड भरण्यासाठी गाडीतच ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा (Railways new special facility) मिळणार आहे. आता तुम्ही ट्रेनमध्येबसून डेबिट कार्डद्वारे सहजपणे दंड भरू शकणार आहात.

Also Read:

रेल्वेने आपली पेमेंट सिस्टम 4G तंत्रज्ञानाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पॉईंट ऑफ सेल (Point of sale) म्हणजेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या POS मशीनमध्ये 2G सिम बसवलेले असते. त्यामुळे दुर्गम भागात नेटवर्कची समस्या निर्माण होते. त्यामुळे आता POS मशीनमध्ये 4G सिम बसवले जाईल त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन रेल्वे तिकीट किंवा दंड भरता येईल. अशा प्रकारे प्रवाशांची रोख रक्कम देण्याच्या त्रासातून सुटका होईल.

You may like to read

याविषयी माहिती देताना रेल्वेने म्हटले आहे की राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनच्या TTE ला या विशेष POS मशीन आधीच देण्यात आल्या आहेत. लवकरच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांनाही या मशीन्सची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी रेल्वेने आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांची तिकिटांसाठी रोख पैसे ठेवण्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही फक्त डेबिट कार्डद्वारे सहज पेमेंट करू शकाल.

ऑनलाइन पेमेंट वाढवण्यासाठी रेल्वेने 36 हजारांहून अधिक टीटीईंना पॉइंट ऑफ सेल मशीन दिल्या आहेत. या मशिनच्या माध्यमातून आता रेल्वे अधिकाऱ्यांना रोख रक्कम न भरता प्रवाशांना सहज तिकीट देता येईल. एखाद्या प्रवाशाला स्लीपर तिकीट घेऊन एसीमध्ये प्रवास करायचा असेल तर टीटीई या मशीनमधून दोन्ही तिकिटांच्या भाड्यातील फरक काढून लोकांना सहज पैसे मागू शकतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.