By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Indore Accident: मोठा अपघात! 50 फूट खोल दरीत कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Indore Accident: मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर-बऱ्हाणपूर महामार्गावर (Indore Burharpur Highway) सिमरोलजवळ असलेल्या भैरव घाटात प्रवासी बस 50 फूट खोल दरीत (Bus accident) कोसळली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले आहे.

Indore Accident : खासगी बस (Bus Accident) 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 6 प्रवाशांचा (6 Death) मृत्यू झाला तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. इंदूर-खंडवा (Indore-Khandwa Highway) महामार्गावर भैरव घाटात ही भीषण दुर्घटना घडली. बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमी नागरिकांना इंदूर (Indore) येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 50 प्रवाशी होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, सिमरोलजवळ असलेल्या भैरव घाटात हा अपघात झाला. 50 खूट खोल दरीत बस कोसळली. बसमध्ये 50 प्रवाशी होते. अपघात इतका भीषण होता की, 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 17 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख..
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले आहे.या अपघातावर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. इंदूरच्या सिमरोलजवळ बस अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांच्या आत्म्याला शांतता लाभो आणि जखमी प्रवाशी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
More than 40 passengers were travelling on the bus. Locals told me that the bus was speeding and while overtaking, the bus lost its balance and fell into the gorge. Till now, the bodies of 5 people brought to the hospital and one died in the hospital: Indore DM Manish Singh pic.twitter.com/9NhIVMCuQS
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 23, 2022
मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत…
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. बस मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करम्याचे देखील निर्देश देण्यात आल्याची माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी दिली आहे.