Instagram क्रिएटर्सच्या खिशाला बसणार फटका, वापरासाठी यापुढे मोजावे लागणार पैसे!
तरुणाईंचे फेव्हरेट असलेले इन्स्टाग्राम आता आपले नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे नवं फिचर खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

Instagram Users: सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश लोकं आता फेसबुकवरून (Facebook) इन्स्टाग्रामकडे (Instagram) वळाले आहेत. सध्या तरुणाईंमध्ये इन्स्टाग्राम रिल्स (Instagram Reels) आणि तिथल्या पोस्टची खूप जास्त क्रेझ निर्माण झाली आहे. तरुणाईंचे फेव्हरेट असलेले इन्स्टाग्राम आता आपले नवीन फीचर लॉन्च (New Feature Of Instagram) करण्याच्या तयारीत आहे. हे नवं फिचर खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामच्या युझर्सना भविष्यात हे अॅप वापरासाठी पैसे मोजावे लागणार आहे. सध्या या फीचरची कंपनीने टेस्टिंग सुरू केली आहे.
Also Read:
इन्स्टाग्रामने सबस्क्रिप्शन (Instagram Subscription) फीचरची चाचणी सुरू केली आहे. हे फीचर जे पेड क्रिएटर्स (Creators)आहेत त्यांना वापरायला मिळणार आहे. विशेष म्हणजे जर पेड नसेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकणार नाही. सध्या ही विशेष सोय 10 अमेरिकी क्रिएटर्सना या सुविधेचा लाभ घेता आला आहे. ज्यामध्ये बास्केटबॉल खेळाडू सेडोना प्रिंस मॉडल केल्सी कुक, अभिनेता-प्रभावकार एलन चिकिन चाउ, ओलंपिक जिमनास्ट जॉर्डन चिली आणि डिजिटल निर्माता लोनी यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे हे फीचर फक्त मेंबर्ससाठी असणार आहे.
कंटेन्ट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी लागणार पैसे –
इंस्टाग्राम क्रिएटर्सना (Instagram Creators) त्यांचा तयार केलेला कंटेन्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. यासाठी साधारण 0.99 डॉलरपासून ते 99.99 डॉलर्स प्रति महिना एवढी रक्कम भरावी लागू शकते. आता नेमके कोणला पैसे द्यावे लागणार आणि का द्यावे लागणार हे लक्षात घेऊया. युझर्सना इंस्टाग्राम वापरासाठी मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. ज्याप्रमाणे युट्यूबची आहे त्याच पद्धतीनं ही मेंबरशिप असेल. ज्यांच्याकडे मेंबर्सशिप आहे त्यांनाच रिल्स किंवा व्हिडीओ पाहाता येणार आहेत. ज्यांच्याकडे मेंबर्सशिप नाही त्यांना रिल्स किंवा व्हिडीओ पाहता येणार नाही असे या नवीन फीचरचे वैशिष्टय आहे. त्यामुळे फ्रीमध्ये इन्स्टाग्राम वापर करणाऱ्या युझर्सच्या खिशाला आता यापुढे चटका बसणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या