इन्स्टाग्रामने भारतात लाँच केलं 'Take a Break' फीचर; जाणून घ्या काय आहे याचे वैशिष्ट्य!
Instagram Take A Break Feature : या फीचरच्या नावावरूनच स्पष्ट होते की युझर्सला ब्रेक घेणे आणि रिमाईंड सेट करण्यासाठी कळविले जाईल.

Instagram Take A Break Feature : सोशल मीडियावरील (social media) फोटो-व्हिडीओ शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने (Instagram) भारतासह (India) जागतिक स्तरावर एक खास असं फिचर लाँच ( Instagram Feature) केले आहे. या फीचरला इंस्टाग्रामने ‘Take a Break’ असं नाव दिलं आहे. नव्याने लाँच झालेल्या या फीचरमुळे युवकांना इंस्टाग्रामचा अधिक चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेता येणार आहे. या फीचरच्या नावावरूनच स्पष्ट होते की, युझर्सला ब्रेक घेणे आणि रिमाईंड सेट करण्यासाठी कळविले जाईल. चला तर मग जाणून घेऊया कसे आहे हे फीचर.
Also Read:
Take a Break ची पब्लिक पॉलिसी (Public Policy) मॅनेजर नताशा जोग ( Natasha jog ) यांनी सांगितले की, तरुणांचे हित आमच्यासाठी महत्वाचे आहे आणि आम्ही ते सुनिश्चित करण्यासाठी लक्ष केंद्रित करीत आहोत. इंस्टाग्रामवर व्यतीत केलेला वेळ आणि त्या विषयी लोकांची चांगली भावना आहे. युवावर्ग, पालक आणि इतरांना इंस्टाग्रामचा वापर अधिक चांगला व्हावा यासाठी ‘Take a Break’ लाँच करण्यात आले आहे.
काय आहे हे फीचर –
Take a Break या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास हे फीचर युजर्सला ब्रेक घ्यायला लावेल. यासह भविष्यात ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडर सेट करण्यास सांगेल. रिमाइंडर सेट कारण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील यावेळी दिल्या जातील. नताशा जोग यांनी पुढे सांगितले की, इंस्टाग्रामवर एक सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण बनविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. Take a Break रिमाइंडर दैनिक सीमेसह आहे. इंस्टाग्रामच्या टूलवर तो तयार होतो. Take a break हे लोकांना सांगते की, तुम्ही इंस्टाग्रामवर प्रत्येक दिवशीय किती वेळ व्यतित करू इच्छिता. यासह इंस्टाग्रामवर सूचना म्यूट करण्याची क्षमता देखील प्रदान केली जाते. Take a Breakला सर्वात आधी युएस, युके, आयलँड, कॅनडा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे लाँच करण्यात आले होते. आता या फीचरला वैश्विक स्तरावर लाँच करण्यात आले आहे. Take a Break फीचर तात्काळ आयओएसवर (IOS) उपलब्ध होईल. आणि काही आठवड्यात एन्ड्रॉईडवर ( Android) रोल आऊट होईल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या