Top Recommended Stories

International Labour Day 2022: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस? जाणून घ्या या काही खास गोष्टी

International Labour Day 2022: दरवर्षी 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. या निमित्ताने या दिवसाची सुरुवात कशी आणि का झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा करतो याविषयी सांगणार आहोत.

Updated: April 30, 2022 6:03 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

International Labour Day 2022: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस? जाणून घ्या या काही खास गोष्टी
International Labour Day

International Labour Day 2022: आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस मजुरांच्या कर्तृत्वाला आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा साजरा केला जातो. असे अनेक देश आहेत जिथे या दिवशी सुट्टी ठेवली जाते. या निमित्ताने कामगार दिनाची (International Labour Day) सुरुवात कशी आणि का झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा करतो याविषयी सांगणार आहोत.

कामगार दिनाची सुरुवात कशी झाली?

या दिवसाची सुरुवात 135 वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका आंदोलनातून (Worker Agitation in America) झाली. या आंदोलनात कामासाठी 8 तास निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी अमेरिकेतील अनेक कामगार सहभागी झाले होते. त्यापूर्वी कामगारांचे मोठ्याप्रमाणात शोषण केले जात होते. कामगारांकडून दिवसातील सुमारे 15 तासांपर्यंत काम करुन घेतले जात होते. शारीरिक श्रम शोषणाच्या विरोधात सर्व कामगार आणि मजुरांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. याविरोधात 1 मे 1886 साली सर्व कामगार आणि मजूर पहिल्यांदाच एकत्र येत रस्त्यावर उतरले. कारखानदार आणि सरकारविरोधात कामगारांचे आंदोलन सुरु होते. त्यांनी फक्त 8 तासांची ड्युटी आणि पगारी रजेची मागणी केली.

You may like to read

या आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरुन कामगार घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात काही मजुरांना आपला जीव देखील गमावावा लागला, तर 100 हून अधिक कामगार जखमी झाले होते. 889मध्ये आंतरराष्ट्रीय समजावादी संमेलनाची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांकडून 8 तासांपेक्षा जास्त काम करुन न घेणे आणि 1 मे हा दिवस आंरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच दरवर्षी 1 मे रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात कधी झाली सुरुवात?

भारतातील चेन्नईमध्ये 1923 साली कामगार दिन साजरा करण्यात आला. लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला होता. या दिवशी प्रथमच लाल ध्वज कामगार दिनाचे प्रतीक म्हणून वापरला गेला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनी तत्कालीन सरकारकडे कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी केली होती. तेव्हापासून कामगारांच्या श्रमाला आणि त्यांच्या त्यागाला समर्पित करत हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या