मुंबई: देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव (Spread of corona) कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन लागला तर तुमचा आर्थिक सोर्स अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्पैथितीत तुमचे योग्य आर्थिक नियोजन असणे गजेचे आहे. कोरोनाची लागण झाल्यास खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंचे बिल आकारण्यात येते. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी आपण नेहमी तयार असायला हवे. तुम्ही हेल्थ इंश्युरन्स (Health insurance) काढलेला नसेल तर आजपासूनच आर्थिक नियोजन (Financial planning) करणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अर्थविषयक तज्ज्ञांनी गुंतवणूक (Investment) आणि आर्थिक नियोजन (Financial planning) या विषयी केलेल्या काही सुचनांची माहिती देत आहोत.Also Read - Maharashtra Corona Update : चिंताजनक! महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 459 नवे रुग्ण, पाच बाधितांचा मृत्यू

योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे

कोरोना काळात (Corona period) कधीही पैशांची गरज पडू शकते. त्यामुळे योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामुळे गुंतवणूक अशा ठिकाणी करा जिथे लॉक-इन पीरियड (Lock-in period) नसेल. यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी तुमचे पैसे काढू शकाल. Also Read - PPF Investment: पीपीएफमध्ये दरमहा 7500 गुंतवून निवृत्तीपूर्वीच बना कोट्यधीश! जाणून घ्या योजना

शॉर्ट टर्म म्यूचुअल फंड्स (SIP)

शॉर्ट टर्म म्यूच्युअल फंड्स (Short Term Mutual Funds) किंवा लिंक्विड फंड्स (Liquid funds) मद्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता यामुळे तुम्हाला FD पेक्षा अधिक परतावा मिळेल आणि गरज पडल्यास तुम्ही तुमचे पैसे देखील काढू शकाल. यासाठी योग्य फंड निवडावा लागेल. त्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. Also Read - Mutual Fund Investment : 5 वर्षे दरमहा 10 हजार भरा आणि मिळवा 14 लाख! गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय

कमी परतावा देणाऱ्या गुंतवणूकीतून पैसे काढा

कोरोना काळात तुम्हाला पैशांची गरज पडल्यास ज्या गुंतवणूकीतून कमी परतावा मिळतो त्यातून पैसे काढणे योग्य राहील. जास्तीचा परतावा देणाऱ्या गुंतवणूकीला शक्यतो हात लावू नये.

लवकरात लवकर घ्या हेल्थ इंश्युरन्स

कोरोनामुळे हेल्थ इंश्युरन्स (Health insurance) किती महत्वाचा आहे हे अधोरेखित झाले आहे. आजारपणाच्या काळात तुमचे सेविंग्ज वाचवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स मदत करू शकतो. यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी चांगले उपचार देखील घेऊ शकता. कमी वयात हेल्थ इंश्युरन्स घेतल्यास तुम्हाला कमी प्रिमियम (Premium) द्यावा लागेल.

आपत्कालीन निधी असणे गरजेचे

नोकरी जाणे किंवा व्यवसाय बंद पडणे अशा स्थितीसाठी देखील तुम्ही तयार असायला हवे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आणीबाणी निधी (Emergency Fund) असणे गरजेचे आहे. हा फंड तुमच्या किमान पाच ते सहा महिण्यांच्या पगाराएवढा असावा. त्यामुळे तुम्हाला कोरोनासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत मदत होईल.

खर्च कमी करा, पैसे वाचवा

कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनासाठी तुम्ही एका महिन्याच्या खर्चांसाठी एक बजेट तयार करायला हवे. तसेच, महिन्याच्या शेवटी झालेल्या खर्चाची तुलना बजेटशी करावी. यामुळे तुम्हाला व्यर्थ खर्चाचा अंदाज येऊ शकतो.