Top Recommended Stories

IOCL Apprentice Recruitment 2022: इंडियन ऑइलमध्ये 1196 अपरेंटिस पदांसाठी बंपर भरती, लगेच असा करा अर्ज!

IOCL Apprentice Recruitment 2022: एकूण 1196 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांपैकी 570 आयओसीएल पश्चिम विभागासाठी आणि 626 आयओसीएल उत्तर विभागासाठी उपलब्ध आहेत. 

Updated: January 30, 2022 4:13 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

IOCL Recruitment 2022
IOCL Recruitment 2022

IOCL Apprentice Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) मार्केटिंग विभागांतर्गत देशभरात ट्रेड अप्रेंटिस आणि तंत्रज्ञ अपरेंटिस पदासाठी अधिसूचना (IOCL Recruitment 2022) जारी केली आहे. सध्या ही भरती पश्चिम आणि उत्तर विभागासाठी आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना IOCLच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. एकूण 1196 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांपैकी 570 आयओसीएल पश्चिम विभागासाठी आणि 626 आयओसीएल उत्तर विभागासाठी उपलब्ध आहेत.

Also Read:

इतर प्रदेशांसाठी अधिसूचना लवकरच आयओसीएलच्या (IOCL Apprentice Notifications) अधिकृत वेबसाइटवर जारी केली जाईल. उमेदवारांना अधिकृत वेबसाईट चेक करत राहण्याचा सल्ला दिला जातो. आयओसीएलच्या या भरती प्रक्रियेमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.

You may like to read

महत्वाच्या तारखा – (IMP Date)

उत्तर विभाग – 31 जानेवारी 2022 ही अर्ज करण्याची तारीख
पश्चिम विभाग – 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची तारीख

पदांचा तपशील – (Position Details)

उत्तर विभाग – 626 पदं
पश्चिम विभाग – 570 पदं

पात्रता (Eligibility) –

12वी उत्तीर्ण असणाऱ्या आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असलेले सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा (Age limit)-

18 ते 24 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

असा करा अर्ज (Do this application)-

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आयओसीएलची अधिकृत वेबसाइट www.iocl.com ला भेट द्या.
– वेबसाईटवरील Careersपर्यायावर क्लिक करा.
– याठिकाणी तुम्ही Apprenticeships पर्यायावर क्लिक करा.
– Engagement of Technical and Non-Technical Trade & Technician Apprentices in Northern Region (Marketing Division)-FY-2021-22 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज दिसेल.
– अर्ज पूर्ण भरुन सबमिटवर क्लिक करा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 4:12 PM IST

Updated Date: January 30, 2022 4:13 PM IST