Top Recommended Stories

काय सांगता! iPhone SE 3 पेक्षाही स्वस्त मिळतोय iPhone 12, जाणून घ्या काय आहे ऑफर

Apple ने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला iPhone SE 3 लॉन्च केला होता. या फोनची सध्या क्रेझ आहे. कंपनीचा (iPhone SE 3 Price in India) हा मोस्ट अफोर्डेबल 5G iPhone आहे. त्यामुळे मोबाईल प्रेमी कमी किमतीत iPhone वापरण्याचा आनंद घेऊ शकतात.

Published: March 24, 2022 10:46 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

काय सांगता! iPhone SE 3 पेक्षाही स्वस्त मिळतोय iPhone 12, जाणून घ्या काय आहे ऑफर

Apple ने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला iPhone SE 3 लॉन्च केला होता. या फोनची सध्या क्रेझ आहे. कंपनीचा (iPhone SE 3 Price in India) हा मोस्ट अफोर्डेबल 5G iPhone आहे. त्यामुळे मोबाईल प्रेमी कमी किमतीत iPhone वापरण्याचा आनंद घेऊ शकतात. (iPhone 12 Price in India) परंतु iPhone SE 3 पेक्षाही iPhone 12 स्वस्त मिळतोय, असं आम्ही आपल्याला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कंपनीनी आपल्या ग्राहकांना स्वस्तात iPhone 12 खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग जाणून घ्या घ्या नेमकी काय आहे ऑफर…?

भारतीय बाजारात iPhone SE 3 च्या 64GB मॉडलची किंमत 43,900 रुपये तर iPhone 12 च्या 64GB मॉडलची किंमत 65,900 रुपये आहे. परंतु ई-कॉमर्स साइट अॅमॅझॉन इंडियावर iphone 12 वर 15 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 55,990 रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी फेडेरल बँकचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 1,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे या डिव्हाइसची किंमत आणखी कमी म्हणजेत 54,490 रुपये होऊन जाते.

You may like to read

एक्सचेंज ऑफरचाही घेऊ शकतात लाभ…

तुम्ही iPhone 12 वर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात. याच्या खरेदीवर 14,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यानंतर तुम्ही हा फोन केवळ 39,590 रुपयांत खरेदी करू शकतात. परंतु एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशनवर डिपेंड करेल.

iPhone 12 चे फीचर्स..

– iPhone 12 अनेक कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात रेड, ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल आणि व्हाइट कलरचा समावेश आहे.
– 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले
– विशेष म्हणजे हे डिव्हाइस Ceramic Shield ने बनवण्यात आला आहे.
– A14 Bionic chip वर हा फोन सादर करण्यात आला आहे. इतर चिपसेटच्या तुलनेत तो खूप फास्ट आहे.
– सोबतच या डिव्हाइसमध्ये ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
– 12MP चा अल्ट्रा वाइड मोड आणि 12MP चा वाइड कॅमेरा तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यूजर्ससा 12MP चा डेप्थ फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे
– हा ​ डिव्हाइस IP68 water resistanc सपोर्टसोबत येतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.