Top Recommended Stories

iQOO 9, iQOO 9 Pro, iQOO 9 SE भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 9 सीरीज अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजअंतर्गत कंपनीने एकाच वेळी तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यात iQOO 9, iQOO 9 Pro आणि iQOO 9 SE मॉडेलचा समावेश आहे.

Published: February 23, 2022 3:04 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

iQOO 9, iQOO 9 Pro, iQOO 9 SE भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 9 Series Launch India: iQOO 9 सीरीज अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजअंतर्गत कंपनीने एकाच वेळी तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यात iQOO 9, iQOO 9 Pro आणि iQOO 9 SE मॉडेलचा समावेश आहे. या तिन्ही स्मार्टफोन्स Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यात 120Hz एमोलेड डिस्प्लेसह अनेक खास फीचर्स मिळतील. कंपनीने iQOO 9 सीरीजसोबत खास लाँचिंग ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या तिन्ही स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत…

Also Read:

iQOO 9, iQOO 9 Pro, iQOO 9 SE: किती आहे किंमत…

कंपनीने iQOO 9 च्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 42,990 रुपये तर 12GB + 256GB मॉडेलची किंमत 46,990 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन Legend आणि Alpha कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

You may like to read

iQOO 9 Pro बाबत सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनच्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 54,990 रुपये तर 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 69,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन Legend आणि Dark Cruise कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.

iQOO 9 SE ला कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. 8GB + 128GB मॉडेलची किंमत 33,990 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 37,990 रुपये आहे. Sunset Sierra आणि Space Fusion कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.

तिन्ही स्मार्टफोन 23 फेब्रुवारीपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्री-बुकिंग Amazon वेबसाइटच्या माध्यमातून करता येईल.

iQOO 9 Pro: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

-iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 3D कर्व्ड स्क्रीनसोबत 6.78 इंचाचा 2K E5 AMOLED डिस्प्ले.
– डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसोबत येतो.
– स्क्रीनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले सेंसर देण्यात आले आहेत.
– हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो.
– फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
– कॅमेराच मेन सेंसर 50MP असून 50MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 16MP चा पोट्रेट सेंसर देण्यात आला आहे. – फोनमध्ये पंच होलसोबत 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
– पावर बॅकअपसोठी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबतच 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे.

iQOO 9: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

-iQOO 9 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.56 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड​ डिस्प्ले
– फोन Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसरवर काम करतो.
– गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये in-display monster टच बटण देण्यात आले आहे.
फोनचा मेन सेंसर 48MP चा आहे. तर 13MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 13MP चा पोट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे.
– फ्रंट 16MP चा आहे.
– 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी 4350mAh बॅटरी देण्यात आली आहे.

iQOO 9 SE: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

– iQOO 9 SE हा स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आले आहे.
– in-display monster टच बटण आहे.
– iQOO चा हा पहिला SE स्मार्टफोन आहे.
– फोनसोबत 6.62 इंचाचा फूल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्याला आला आहे.
– फोनमध्ये 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबतच 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
– 48MP चा प्रायमरी सेंसर, 13MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP चा मायक्रो सेंसर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.