Top Recommended Stories

IT Job Alert : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपन्या देत आहे 90000 नोकर्‍या, जाणून घ्या डिटेल्स...

IT Job Alert : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ( IT ) अग्रगण्य असलेल्या टीसीएस ( TCS ) आणि इन्फोसिस ( Infosys ) या कंपन्यांनी चालू वर्षात मोठी नोकर भारती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, TCS कंपनी 40,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. तर Infosys चालू आर्थिक वर्षात 50,000 हून अधिक नोकरीच्या संधी देण्याचा विचार करत आहे.

Published: April 30, 2022 12:33 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

job
job

IT Job Alert : नोकरीच्या (Job ) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ( IT ) अग्रगण्य असलेल्या टीसीएस ( TCS ) आणि इन्फोसिस ( Infosys ) या कंपन्यांनी चालू वर्षात मोठी नोकर भारती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, TCS कंपनी 40,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. तर Infosys चालू आर्थिक वर्षात 50,000 हून अधिक नोकरीच्या संधी देण्याचा विचार करत आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सध्या चांगले दिवस आले आहेत. मात्र, अशातच कर्मचाऱ्यांचं नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी कंपन्या नवीन भरती वाढवत आहेत.

कर्मचार्‍यांचे नोकर्‍या सोडण्याचे प्रमाण वाढले

माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सध्या चांगले दिवस आले आहेत. मात्र, अशातच कर्मचाऱ्यांचं नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मार्च 2022 तिमाहीत इन्फोसिसचा अ‍ॅट्रिशन रेट (कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण) 27.7 टक्क्यांवर पोहोचला. हा दर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 25.5 टक्के होता. 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत, TCS ची कर्मचारी गळती 17.4 टक्के होती, एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत ती केवळ 7.3 टक्के होती. डिसेंबर 2021 च्या तिमाहीतही, TCS चं हे प्रमाण 15.3 टक्के होतं. टीसीएस व्यवस्थापनाने सांगितलं की, शेवटच्या-बारा-महिन्याच्या (एलटीएम) आधारावर ही संख्या जास्त आहे. इन्फोसिस व्यवस्थापनाचंही हेच म्हणणं आहे. कंपनी वर्षाची सुरुवात 40,000 भरतीचे लक्ष्य घेऊन करत आहे आणि वर्षभरात गरज पडल्यास ती वाढवेल, असे TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

You may like to read

WFH सुरू राहणार

वर्क फ्रॉम होम (WFH) मॉडेल आयटी क्षेत्रात चांगल्या प्रकारे चाललं आहे. यानंतर आता या क्षेत्रात हायब्रीड वर्क मॉडेल लागू करण्याची योजना तयार केली जात आहे. TCS ने असंही म्हटलं आहे की, कंपनी त्यांचे भविष्यवादी आणि पाथ-ब्रेकिंग 25X25 मॉडेल स्वीकारण्यासाठी वचनबद्ध आहे. या मॉडेलचा अर्थ आहे की, कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना केव्हाही ऑफिसमधून काम करणं आवश्यक नाही आणि त्यांना त्यांच्या वेळेतील 25 टक्क्यांहून अधिक वेळ ऑफिसमध्ये घालवण्याची गरज नाही. यासह TCS ऑकेजनल ऑपरेटिंग झोन आणि हॉट डेस्क देखील सेट करत आहे. तर Infosys कार्यालयात टप्प्याटप्प्याने परत येण्याची योजना आखत आहे. यामुळे कर्मचार्‍यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस कार्यालायत हजर राहावं लागेल. यासह कंपनी दीर्घ काळासाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 12:33 PM IST