ITR filing date extended: आयकर रिटर्न भरणाऱ्यांना पुन्हा दिलासा, जाणून घ्या नवी तारीख

CBDT कडून सांगण्यात आले की कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे करदात्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता ITR भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

Updated: January 12, 2022 1:32 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

ITR ALERT: All You MUST Know Ahead of July 31 Deadline
ITR ALERT: All You MUST Know Ahead of July 31 Deadline

ITR filing date extended: केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख वाढवली आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing Last Date) 15 मार्चपर्यंत भरता येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून (CBDT) मूल्यांकन वर्ष (Assessment Year) 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटी सरकारने आयकर रिटर्नची भरण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे असे सांगितले होते.

Also Read:

CBDT कडून सांगण्यात आले की कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे करदात्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता ITR भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदींनुसार विविध लेखापरीक्षण अहवाल ई-फायलिंग करताना येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे. आयकर भरणारे आता 15 मार्च 2022 पर्यंत आयटीआर दाखल करू शकतील.

जाणून घ्या ई-पोर्टलद्वारे ITR कसा भरावा

 1. https://www.incometax.gov.in/ या लिंकचा वापर करून आयकर ई-पोर्टलला भेट द्या.
 2. होमपेजवर Login Here पर्याय निवडा
 3. Enter Your User ID पर्यायामध्ये तुमचा परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच PAN नंबर टाका आणि नंतर Continue वर क्लिक करा.
 4. यानंतर, तुम्हाला प्राप्त झालेल्या सिक्योर अॅक्सेस मेसेजच पुष्टी करावी लागेल.
 5. त्यानंतर continue वर क्लिक करा
 6. येथून तुम्हाला संदेश किंवा व्हॉइस कॉलद्वारे 6 अंकी OTP प्राप्त करायचा आहे की नाही हे निवडावे लागेल.
 7. पर्यायावर क्लिक केल्यानंतर एंटरवर क्लिक करा.
 8. तुम्हाला मिळालेला OTP 15 मिनिटांसाठी वैध असेल, त्यानंतर तुम्हाला एक नवीन जनरेट करावा लागेल.
 9. तुम्हाला योग्य OTP टाकण्यासाठी तीन संधी मिळतील.
 10. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि नंतर login वर क्लिक करा.
 11. यशस्वी पडताळणीनंतर प्राप्तिकर ई-फायलिंग डॅशबोर्ड दिसेल
 12. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
 13. आधार लॉगिनसाठी तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता आणि निर्देशानुसार OTP देऊ शकता.
 14. नेट बँकिंगसाठी तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 7:44 PM IST

Updated Date: January 12, 2022 1:32 PM IST