जयपूर: मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट (Mobile Battery Blast) होऊन जखमी झाल्याच्या किंवा कोणाचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. पण इअरफोनचा स्फोट (Earphone speaker blast) झाल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. पण अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ब्लूटूथ एअरफोनचा (Bluetooth Earphone) स्फोट होऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर (Jaipur) जिल्ह्यातील उदयपुरिया गावामध्ये ही घटना घडली आहे. राकेश नागर (28 वर्षे) असं या मृत तरुणाचे नाव आहे. राकेशने गाणी ऐकण्यासाठी इअरफोन्स लावले होते. त्याचवेळी इअरफोनचा स्पीकर फुटला. स्पीकरच्या स्फोटामुळे मोठा आवज झाला आणि राकेशच्या कानातून रक्त येऊ लागले. त्याला तातडीने नजीकच्या सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टराने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे राकेशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

सिद्धिविनायक रुग्णालयाचे (Siddhivinayak Hospital) डॉक्टर एल. एन रुंडला यांनी सांगितले की, ‘देशात इअरफोनच्या स्फोटाची ही पहिलीच घटना आहे. पण या घटनेमुळे तरुणाचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे (cardiac arrest) झाला असावा.’ राकेश नागरचे याचवर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाले होते. तो एकटा घरी असताना ही घटना घडली. राकेश स्पर्धा परीक्षेची (competition examination) तयारी करत होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Also Read - Big News: कर्मपूजा उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, 7 मुलींचा तलावात बुडून मृत्यू!

दरम्यान, या घटनेमुळे इअरफोन्स वापरणाऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. कानाला इअरफोन्स लावताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या कंपनीचे इअरफोन्स लावत जा. जेणे करुन तुमच्या आरोग्याला काहीच इजा पोहचणार नाही. त्यामुळे ही घटना मोठी असून नागरिकांना इयरफोन वापरताना सावध राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.