Top Recommended Stories

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, जैशच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir Encounter : ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

Updated: January 30, 2022 11:30 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Jammu-Kashmir Encounter

Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) भारतीय लष्कराच्या जवानांना (Indian Army Jawan) मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोएबा (lashkar-e-taiba) आणि जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तब्बल 12 तास ही चकमक सुरु होती. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी (JeM commander Zahid Wani) आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

Also Read:

You may like to read

पुलवामा (Pulwama) आणि बडगाममध्ये (Budgam) दहशतवादी (Terrorist) आणि जवानांमध्ये (Jawan) चकमक झाली. पुलवामामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले तर बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. बडगाममध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली त्याठिकाणावरुन जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. काश्मीरचे आयपीजी विजय कुमार (IPG Vijay Kumar) यांनी याबद्दल माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या नायरा भागात आणि मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी घटनास्थळाला घेराव घातल शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी उपस्थित दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवानांना पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. 12 तास ही चकमक सुरु होती. बडगाम येथे झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन एके-56 रायफल आणि शस्त्रसाठा जप्त केला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 11:29 AM IST

Updated Date: January 30, 2022 11:30 AM IST