Top Recommended Stories

Jio Month Validity Prepaid Plan: नो टेन्शन! जिओकडून ग्राहकांची मागणी मान्य, 31 दिवसांचा 'कॅलेंजर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन' सादर

Jio Month Validity Prepaid Plan: जिओने ग्राहकांची मागणी मान्य करत एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. जिओने 'कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन' सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 259 रुपये असणार आहे.

Updated: March 28, 2022 3:46 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Reliance Jio Prepaid Plan
Reliance Jio Prepaid Plan

Jio Month Validity Prepaid Plan : सततच्या महागाईमध्ये (Inflation) सर्वजण त्रस्त झाले आहेत. त्यात आता मोबाईल फोनचे रिचार्ज (Mobile Recharge) देखील महागले आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी (Telecome Company) रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशामध्ये भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनी जिओने (Jio) ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. जिओने ग्राहकांची मागणी मान्य करत एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. जिओने ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन’ (Jio Month Validity Prepaid Plan) सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 259 रुपये असणार आहे.

Also Read:

जिओच्या या नव्या कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅनची किंमत स्वस्त असून यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग डेटा आणि 1.5 GB डेटा ही सुविधा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्लॅनचे बेनिफिट्स एका कॅलेंडर महिन्यासाठी असणार आहे. म्हणजेच ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज करणार पुढच्या महिन्यात त्याच तारखेला तुम्हाला रिचार्ज करावा लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण एक महिना तुम्हाला या रिचार्ज प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे जर तुम्ही 28 मार्चला मोबाईलवर रिचार्ज केला तर तुमची पुढची रिचार्जची तारीख 28 एप्रिल असणार आहे. याच तारखेला तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागेल. जिओच्या या नवीन रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहकांना आनंद झाला आहे.

You may like to read

अनेक टेलिकॉम कंपन्यांनी 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षाचे 12 महिने असताना सुद्धा 13 वेळा रिचार्ज करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी मागणी केली होती की 30 किवा 31 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन आणावा. ग्राहकांची ही मागणी आता जिओ कंपनीने मान्य करत स्वस्त आणि परवडणारा कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन आणला आहे. या प्लॅमध्ये ग्राहकांना रोज 1.5 GB डेटा मिळेल. त्याबरोबर अनलिमिटेड कॉल्स आणि रोज 100 SMS मोफत मिळणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.