मुंबई: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) अर्थात मुंबई मेट्रोकडून विविध महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईट mahametro.org पर जॉब नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही संधी उपलब्घ करून देण्यात आली आहे. बीई (BE) किंवा बीटेकची (B Tech) पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. व्यवस्थापक (Manager)आणि सहव्यवस्थापक (Assistant Manager) पदांसाठी ही भरती होत आहे.Also Read - अरेरे... गुढीपाडव्याला सुरु झालेली Mumbai Metro पडली बंद, ट्वीट करत मुंबई मेट्रोने व्यक्त केली दिलगिरी!

मुंबई मेट्रोसाठी होणारी भरती नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच्या (Nagpur Metro Rail Project) माध्यमातून होत आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येईल. Also Read - Mumbai Metro Recruitment 2022: मुंबई मेट्रोत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 2 लाखांपर्यंत मिळेल पगार!

या पदांसाठी आहे भरती-

– व्यवस्थापक (टेलिकॉम) – 2 जागा
– व्यवस्थापक (सिग्नल) – 2 जागा
– व्यवस्थापक (आईटी) – 1 जागा
– व्यवस्थापक (ओएचई) – 1 जागा
– व्यवस्थापक (पीएसआई) – 1 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम ऍनालिस्ट आईटी/टेलिकॉम) – 2 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नल) – 2 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (रॉलिंग स्टॉक) – 1 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (ओएचई) – 2 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (वीज पुरवठा सप्लाई) – 2 जागा
– सहाय्यक व्यवस्थापक (टेलिकॉम अँड एएफसी) – 2 जागा Also Read - BEST Card: मुंबईकरांचा प्रवास सोपा होणार; एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास करता येणार

असा कराल अर्ज ?

– उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागेल.
– अर्ज mahametro.org वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
– अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.
– अर्ज व्यवस्थित भरून 13 जुलै 2021 च्या आधी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीच्या समोर, रामदेशपथ, नागपूर- 440010 या पत्त्यावर पाठवावा.

शैक्षणिक पात्रता-

– अर्जदारानं एआयसीटीई (AICTE) किंवा यूजीसीची (UGC) मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं.
– व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय कमाल 40 वर्षे असावं. तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय कमाल 35 वर्षे असावं.

अशी असेल निवड प्रक्रिया-

– या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
– अर्जदार शॉर्ट लिस्ट करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
– अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर मुलाखतीची माहिती पाठवण्यात येईल.
– वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण होईल.