मुंबई : हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस “ज्येष्ठ पौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत अतिशय पवित्र मानला जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा व्रत 24 जून 2021 रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रतात पवित्र नदीत स्नान आणि दान करण्यास खूप महत्त्व आहे. पौर्णिमेचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
ज्येष्ठ पौर्णिमा शुभ मुहूर्त (Jyeshtha Purnima 2021 Shubh Muhurat)
ज्येष्ठा, शुक्ल पौर्णिमा
प्रारंभ – 24 जून सकाळी 03:32 वाजता
समाप्ती – 24 आणि 25 जूनदरम्यान मध्यरात्री 12:09 वाजता
ज्येष्ठ पौर्णिमा पूजा विधी (Jyeshth Purnima Pooja Vidhi)
या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर भगवान विष्णूचे व्रत करावे. रात्री चंद्राला दूध आणि मध मिसळून अर्घ्य द्यावे. यामुळं भाविकांचे सर्व रोग आणि त्रास दूर होतात. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
पौर्णिमा तिथीचे महत्त्व (Jyeshtha Purnima Importance)
पौर्णिमेच्या तिथीला पवित्र नदीत स्नान आणि दान यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्यास विशेष फळ प्राप्ती होते. पौर्णिमेच्या तिथीलाला चंद्र पूर्ण आकारात असतो. या दिवशी चंद्राची पूजा व व्रत केल्याने चंद्र मजबूत होतो. त्यामुळे आपल्या मानसिक आणि आर्थिक समस्या दूर होतात. भगवान विष्णूची उपासना केल्याने दु:खांचा नाश होतो आणि सुख प्राप्त होते. पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवून, विष्णूची विधिवत पूजा करुन चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यास आपल्या घरात आनंद आणि भरभराट राहते. ही तिथी देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे, म्हणून या दिवशी श्री हरीसह लक्ष्मीची पूजा केल्याने दारिद्र्याचा नाश होतो.