केरळ राज्यातील मलप्पुरम् जिल्ह्यातील कोट्टक्कल येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 17 वर्षाच्या गरोदर मुलीनं यूट्यूबवर (YouTube) व्हिडीओ पाहून स्वत:ची प्रसुती करून घेतली आहे. अल्पवयीन मुलीनं एक बाळाला जन्म दिला आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे हा प्रकार मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षातही आला नाही. अल्पवयीन मुलीनं 9 महिन्यांची गर्भधारणा लपवून ठेवली होती. घरातील एकाही सदस्याला तिनं याबाबत माहित होऊ दिलं नाही.Also Read - Crime News: Facebook वर झाली मैत्री...पहिल्याचं भेटीत दिलं गुंगीचं औषध आणि धावत्या कारमध्ये...

मीडिया रिपोर्टनुसार, मुलीनं 20 ऑक्टोबरला आपल्या बेडरूममध्ये YouTube व्हिडिओपाहून बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म देताच तिनं नाळ कापून टाकली. नवजात शिशुच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानं या सगळ्या प्रकाराचा भंडाफोड झाला. Also Read - Priyanka Chopra ने इंस्टाग्राम प्रोफाइलवरून हटवले Jonas आडनाव! घटस्फोटाच्या चर्चा, नेटिझन्सकडून भन्नाट प्रतिक्रिया

आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी पीडितेच्या घराशेजारी राहतो. आरोपी आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध आहे. दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर पीडिती गरोदर झाली होती. Also Read - Viral Video रेल्वे प्रवासादरम्यान बसायला जागा मिळाली नाही, प्रवाशांने केलेला देसी जुगाड पाहून पोट धरुन हसाल!

कोट्टक्कलचे आरोग्य अधिकारी एम.के. शाजी यांनी दिलेले माहिती अशी की, आरोपी आणि पीडिता गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या नातेवाईकांना याबाबत माहित होतं. परंतु पीडिती गरोदर होती, ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. गरोदर राहिल्यानंतर पीडित मुलगी ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीतच राहात होती. पीडितेचे वडील सुरक्षा गार्ड असून तिची आई गृहिणी आहे.