Ladakh Tourist Places: लडाखचे सौंदर्य लावेल वेड, वीकेंडमध्ये या ठिकाणांना द्या भेट
Ladakh Tourist Places: लडाख हे उन्हाळ्यातील पर्यटनासाठी भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहाण्यासारखं आहे. लडाखमध्ये तलाव, दऱ्या, पर्वत पर्यटकांना आकर्षित करतात. अनेक पर्यटक बाईकवरून लडाखचा फेरफटका मारतात.

Ladakh Tourist Places: या वीकेंडला जर तुमचा फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर लडाख (Best tourist places in ladakh) तुमच्यासाठी उत्तम ठिकाण ठरू शकेल. येथील नैसर्गिक सौंदर्य (Ladakh Tourism) तुम्हाला वेड लावेल. लडाख हे भारतातील उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी (Popular Summer Destinations) एक आहे. पर्यटक येथील मठांना भेट देऊ शकतात आणि पर्वतारोहण करून नवीन अनुभव घेऊ शकतात. याशिवाय लडाखमध्ये तलावांपासून ते दऱ्या आणि पर्वतांपर्यंत खूप काही (Summer Destinations in India) पाहण्यासारखे आहे. लडाख हे एक असे ठिकाण आहे, जिथले नैसर्गिक सौंदर्य आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. यामुळेच अनेक पर्यटक बाईकवरून लडाखचा फेरफटका मारतात आणि येथील ठिकाणे शोधतात.
लडाखमध्ये अनेक प्राचीन बौद्ध मठ आहेत. त्यामुळे याला ‘लिटल तिबेट’ असेही म्हणतात. तसेच लडाख आणि तिबेटची आंतरराष्ट्रीय सीमा एकच आहे. लडाखमध्ये तुम्हाला बौद्ध संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा प्रभाव पाहायला मिळेल. तुम्ही अद्याप लडाखला भेट दिली नसेल. तर तुम्ही इथे जाऊन लेह आणि लडाखचा थरारक प्रवास अनुभवू शकता. लडाख हा बहुतांशी ओसाड जमीन आणि उंच पर्वत असलेला भाग असला, तरीही पर्यटकांना पाहण्यासारखी आणि एन्जॉय करण्यासारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत.
पॅंगॉन्ग तलाव
लडाखमधलं पॅंगॉन्ग सरोवर देखील तुम्ही पाहू शकता. ब्लू पॅंगॉन्ग लेक हे हिमालयातील लेह-लडाख जवळ 12 किमी लांब असलेले प्रसिद्ध तलाव आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतापासून तिबेटपर्यंत पसरलेले आहे. हा तलाव सुमारे 43,000 मीटर उंचीवर आहे. येथील तापमान -5°C ते 10°C पर्यंत असते. हिवाळ्याच्या काळात हा तलाव पूर्णपणे गोठतो. या तलावाला पॅंगॉन्ग त्सो असेही म्हणतात. हे ठिकाण इतके सुंदर आहे की येथे अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. लडाखचे पॅंगॉन्ग सरोवर बघायला तुम्ही एकदा जरूर जा. या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. इथल्या अगदी स्वच्छ पाण्याचं दृश्य तुम्हाला शांत आणि सुंदर अनुभव देईल.
थिकसे मठ
थिकसे मठ लेहपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. हे देखील खूप सुंदर ठिकाण आहे. येथे 12 मजली उंच इमारत आहे. ही इमारत या परिसरातील सर्वात मोठा मठ आहे. जिथे तुम्हाला भव्य स्तूप, शिल्पे, चित्रे, थांगका आणि तलवारी पाहायला मिळतात. येथे एक मोठा स्तंभ देखील आहे. ज्यामध्ये भगवान बुद्धांनी दिलेले संदेश आणि शिकवण लिहिलेली आहे.
खारदुंगला पास
खारदुंगला पास हे एक सुंदर प्रवेशद्वार आहे. जे नुब्रा आणि श्योक खोऱ्यांच्या दिशेने जाते. लडाखमध्ये पाहण्यासारख्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान येथे देखील भेट देऊ शकता.
मरखा व्हॅली
मरखा व्हॅली लडाख ट्रेकिंग प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे. जे सुमारे 11,000 फुटांवर सुरू होते आणि 17,000 फुटांवर संपते. हा इथला सर्वात सुंदर ट्रेक आहे. वाटेत पर्यटकांना बौद्ध गावे आणि खडकाळ दऱ्या दिसतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या